रेशनकार्डमध्ये दत्ता ऐवजी नाव छापलं कुत्ता; अधिकाऱ्यासमोर दिसताच लागला भुंकायला [Video]

ज्या व्यक्तीचे नाव दत्ता ऐवजी कुत्रा असे लिहिले आहे, ते म्हणजे श्रीकांती दत्ता, जे मीडियाशी बोलताना म्हणाले, 'मी रेशन कार्डमध्ये नाव दुरुस्तीसाठी तीनदा अर्ज केला होता. तिसऱ्यांदा श्रीकांती दत्ताऐवजी माझे नाव श्रीकांती कुत्रा असे लिहिले गेले.

As soon as the name was called Kutta instead of Dutta, he started barking in front of the officer
दत्ता ऐवजी नाव कुत्ता होताच अधिकाऱ्यासमोर लागला भुंकायला   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • रेशन कार्डमध्ये दत्ताऐवजी कु्त्ता म्हणजे कुत्रा नाव टाकण्यात आले होते.
  • ेशन कार्डमध्ये नाव दुरुस्तीसाठी तीनदा अर्ज केला होता.
  • ्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे

Viral Video: पश्चिम बंगालचा (West Bengal) एक व्हिडियो सोशल मीडियावर (Social Media)खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  पश्चिम बंगालच्या (West Bengal)बांकुरा (bankura) जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीचे नाव रेशन कार्डमध्ये (ration card) दत्ताऐवजी कु्त्ता म्हणजे कुत्रा टाकण्यात आले होते. त्यामुळे त्या व्यक्तीला राग आला. आपला राग व्यक्त करणयासाठी त्याने एक विचित्र कल्पना शोधून काढली. त्याची कल्पना पाहून  सगळे आवक झाले आहेत आणि अधिकाऱ्याला  त्याच्यासमोर पळ काढावा लागलाय. (Dutta's name printed in ration card instead of Kutta; He started barking  in front of the officer)

अधिक वाचा  :  धक्कादायक : 24 वर्षांच्या अभिनेत्रीचा Heart Attack ने मृत्यू

नाव बदलण्यासाठी अधिकाऱ्यासमोर गेला आणि गाडीत बसलेल्या अधिकाऱ्यावर नाराजी व्यक्त करत भुंकायला लागला. आता म्हणाल त्या व्यक्ती हे सर्व प्रसिद्धीसाठी केले असेल परंतु तुम्ही समजत आहे ते चुकीचे आहे. याचे कारण जाणून घेण्यासाठी तुम्हीच वाचा... 

अधिक वाचा  : कोश्यारींवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र

काय आहे घटना 

ज्या व्यक्तीचे नाव दत्ता ऐवजी कुत्रा असे लिहिले आहे, ते म्हणजे श्रीकांती दत्ता, जे मीडियाशी बोलताना म्हणाले, 'मी रेशन कार्डमध्ये नाव दुरुस्तीसाठी तीनदा अर्ज केला होता. तिसऱ्यांदा श्रीकांती दत्ताऐवजी माझे नाव श्रीकांती कुत्रा असे लिहिले गेले. यामुळे मला मानसिक त्रास झाला. काल मी पुन्हा दुरुस्तीसाठी अर्ज करायला गेलो आणि तिथल्या जॉइंट बीडीओला पाहून मी त्याच्यासमोर कुत्र्यासारखं वागू लागलो. माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि ते पळून गेले. आमच्यासारखे सामान्य लोक कितीवेळा काम सोडून सुधारणांसाठी अर्ज करतील?' प्रश्न त्यांनी केला. 

व्हायरल व्हिडिओ

या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे आणि लोकांनी ज्या पद्धतीने निषेध केला त्याचे कौतुक केले जात आहे.लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना काही युजर्सनी सांगितले की, या चुकीबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी माफी मागावी.  तर, अशा दोषी सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकारने तातडीने कारवाई करावी, असे काहींनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी