तरुणीनं ६०० ठिकाणी मागितली नोकरी, पण ‘या’ कारणामुळे मिळाला नकार

६०० वेळा नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर एका महिलेला कुठलीही नोकरी मिळाली नाही. यामुळे अनेकदा डिप्रेशनमध्ये गेलेल्या या महिलेनं एबीसीला एक इंटरव्यू दिला. त्यात तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली.

Girl in Depression
तरुणीनं ६०० ठिकाणी मागितली नोकरी,‘या’ कारणामुळे मिळाला नकार  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • महिलेनं नोकरीसाठी ६०० वेळा केला अर्ज, पण एकही नोकरी मिळाली नाही
  • महिला यामुळे गेली डिप्रेशनमध्ये, महिलेनं इंटरव्यूमध्ये सांगितला तिच्यासोबत घडलेली संपूर्ण घटना
  • ऑस्ट्रेलियाला यापूर्वी ही अशा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता, त्यातून बाहेर पडण्यासाठी तब्बल एक दशक लागलं होतं.

नवी दिल्ली: लीगल असिस्टंट (Legal Assistant) असलेल्या एका महिलेनं तब्बल ६०० ठिकाणी नोकरीसाठी अर्ज (Job Application) केला होता. मात्र कोरोना व्हायरस (Corona Virus) महामारीच्या संकटात यावर्षीच्या सुरूवातीपासून आतापर्यंत तिला एकही नोकरी मिळालेली नाही. सिडनी (Sydney) इथं राहणारी महिला सिनीड सिम्पकिन यांनी एका इंटरव्यूमध्ये (Interview) याबाबत खुलासा केला. एबीसीला दिलेल्या इंटरव्यूमध्ये त्यांनी सांगितलं की, तिच्या आत्मसन्मानाला हा खूप मोठा धक्का होता.

महिलेनं सांगितलं की, यामुळे अनेकदा ती डिप्रेशनमध्ये गेली होती. मी आपलं आयुष्य जगण्यासाठी एक नोकरी शोधत होती, पण हे मी करू शकली नाही. महिलेनं म्हटलं की, आता तिला ती आपलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकेल असं वाटत नाही. तिला आता असं वाटतंय की, पूर्ण आयुष्य नोकरीचा शोध घेण्यातच जाईल. ही घटना आणि अशी परिस्थिती फक्त सिनीड यांचीच नाही. तर ऑस्ट्रेलियामध्ये बुडत चाललेल्या अर्थव्यस्थेमुळे मोठ्या संख्येनं लोकांची नोकरी गेलेली आहे.

सुरूवातील फिटनेस, इंटरटेन्ममेंट, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल इंडस्ट्रीज ठप्प झाल्या आणि अकाऊंटिंग, रिटेल आणि मीडिया सेक्टर्स पण बंद होण्याच्या तयारीत आहे. एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, आता देशाची इकॉनॉमी आणखी खराब झालीय.

ऑस्ट्रेलियामध्ये यापूर्वी १९९१ मध्ये मंदी आली होती. या दरम्यान पण देशाची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झाली होती. तेव्हा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी देशाला तब्बल १० वर्ष लागले होते. हळुहळू देशाची अर्थव्यवस्था रूळावर आली होती. मात्र या कोरोना महामारीनं तर सर्वच प्रयत्न सध्या अयशस्वी केले आहेत आणि देश पुन्हा दशकांपूर्वीच्या आर्थिक अवस्थेत पोहोचला आहे.

२००८ पासून २०१८ पर्यंत दशकामध्ये मोठ्या संख्येत तरूणांना नोकरी मिळवण्यासाठी संकटाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि मंदी बघता, देशाला यातून बाहेर पडण्यासाठी आता तब्बल तीन दशकांचा कालावधी लागू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

ऑस्ट्रेलिया फक्त एकच देश नाहीय, जो कोरोना व्हायरस आणि आर्थिक संकटांचा सामना करतोय. जगातील अनेक मोठ-मोठे देश सध्या याच परिस्थितीतून जात आहेत. अमेरिकेसारखं बलाढ्य राष्ट्र पण सध्या अनेकांच्या नोकऱ्या वाचवू शकत नाहीय. खूप जण बेरोजगार झाले आहेत. तर भारतही या परिस्थितीपासून काही वेगळा नाहीय. भारतात अनेक विभागांमधील विशेष करून खाजगी कंपन्यांमध्ये अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. आता या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भारतालाही खूप कष्ट करण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी