'इतकी' अंडी खाणं बेतलं जीवावर, जाणून घ्या काय आहे प्रकरण

मित्रा-मित्रांमध्ये पैज लागल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. अशाच प्रकारे दोन मित्रांमध्ये अंडी खाण्याची पैज लागली आणि जिंकणाऱ्याला दोन हजार रुपये देण्याचं ठरलं. यानंतर जेकाही घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसला

eggs eat up man dies rs 2000 challenge viral trending news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • ५० अंडी खाण्याची मित्रांमध्ये लागली पैज
  • जिंकल्यास दोन हजार रुपये देण्याचं ठरलं
  • सुभाष यादव नावाच्या व्यक्तीने ४२ अंडी खाताच पोहोचला रुग्णालयात आणि मग...

जौनपूर: उत्तरप्रदेशातील जौनपूर येथे दोन मित्रांमध्ये अंडी खाण्याची पैज लागली. हसत-खेळत लावलेली ही पैज एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक सुभाष याची आपल्या एका मित्रासोबत अंडी खाण्याची आणि दारू पिण्याची पैज लागली होती. या पैजनुसार जो एकावेळी ५० अंडी खाईल त्याला दोन हजार रुपये देण्याचं ठरलं होतं.

उत्तरप्रदेशातील जौनपूर येथील बीबीगंज येथील ही घटना आहे. दोन मित्रांमध्ये लावण्यात आलेल्या पैजनुसार, ५० अंडी खाल्ल्यानंतर दारू सुद्धा प्यायची आहे. मित्रासोबत लावलेल्या पैजनंतर सुभाष यादव याने अंडी खाण्यास सुरुवात केली. सुभाष एकामागोमाग एक असे अंडी खाऊ लागला. ४१ अंडी खाल्ल्यानंतर सुभाषने ४२वा अंड देखील खाल्लं आणि त्यानंतर तो अचानक बेशुद्ध झाला. 

पीडित सुभाष यादव हा बेशुद्ध होताच त्याला उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडित सुभाष याची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला लखनऊ येथील संजय गांधी रुग्णालयात हलवण्याचे सांगितले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरु असताना सुभाष यादव याचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सुभाष यादव याने एकत्र इतकी अंडी खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले आहे. तर या प्रकरणी सुभाषच्या नातेवाईकांकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुभाषने याच वर्षी दुसरं लग्न केलं होतं. सुभाषला पहिल्या पत्नीपासून चार मुली आहेत आणि मुलगा व्हावा यासाठी त्याने दुसरं लग्न केलं होतं. सुभाषची दुसरी पत्नी गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता सुभाषचा मृत्यू झाल्याने परिवारातील सदस्यांना एकच धक्का बसला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...