मुलाने आईला थोबाडीत मारले, आईचा लगेच मृत्यू

elderly woman dies after her own son slaps her viral video उत्तर भारतातील दिल्लीत जन्मदात्या आईचा अनादर करण्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे घटनास्थळीच आईचा मृत्यू झाला

elderly woman dies after her own son slaps her viral video
मुलाने आईला थोबाडीत मारले, आईचा लगेच मृत्यू 

थोडं पण कामाचं

  • मुलाने आईला थोबाडीत मारले, आईचा लगेच मृत्यू
  • दिल्लीच्या बिंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
  • पोलिसांनी मुलाला केली अटक, सीसीटीव्ही फूटेजमध्ये स्पष्ट दिसली घटना

नवी दिल्ली: उत्तर भारताला कावड यात्रेची मोठी परंपरा आहे. आईवडिलांचा आदर करायला सांगणाऱ्या अनेक संत महंतांचा जन्म उत्तर भारतात झाला आहे. या उत्तर भारतातील दिल्लीत जन्मदात्या आईचा अनादर करण्याची धक्कादायक घटना घडली. पोटच्या मुलाने आईला थोबाडीत मारले. स्वतःच्या मुलानेच कानाखाली मारल्यामुळे आईला प्रचंड धक्का बसला. मार जोरात लागला आणि घटनास्थळीच आईचा मृत्यू झाला. (elderly woman dies after her own son slaps her viral video)

मुलाच्या थोबाडीत मारण्याने आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या बिंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणात वृद्ध आईला थोबाडीत मारणाऱ्या मुलाला पोलिसांनी अटक केली. तसेच ज्या ठिकाणी घटना घडली तिथले सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांनी अटक केलेली व्यक्ती एका वृद्ध महिलेला थोबाडीत मारत असल्याचे दिसत आहे. मार लागताक्षणी वृद्ध महिला घटनास्थळी कोसळली. ती बेशुद्ध झाल्याचे समजून थोबाडीत मारणारी व्यक्ती संबंधित महिलेला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे तपासणीअंती डॉक्टरांनी महिलेला मृत घोषीत केले. महिलेच्या चेहऱ्यावरील वळ बघून डॉक्टरांनी पोलिसांना बोलावले. चौकशीअंती पोलिसांनी महिलेला थोबाडीत मारणाऱ्या तिच्या मुलाला अटक केली.

मुलाची चौकशी केल्यानंतर घटनास्थळावरुन पोलिसांनी इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज ताब्यात घेतले. याआधी बिंदापूर पोलीस ठाण्यात एका वादासंदर्भात माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी विकास इमारतीत आला. मात्र इमारतीच्या मालकासोबतचा रहिवाश्यांचा वाद मिटला आहे असे सांगून स्थानिकांना पोलिसाला सविस्तर माहिती देणे टाळले होते. पण पोलीस कर्मचारी येण्याच्या थोडा वेळ आधीच मुलाने मारल्यामुळे घटनास्थळी कोसळलेल्या महिलेला मुलगा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. स्थानिकांनी महिला शुद्धीत येईल, असे समजून आधीच पोलिसांना काही सांगू नये या विचारातून माहिती देणे टाळल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वादानंतर रणवीर नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या ७६ वर्षांच्या आईला, अवतार कौर यांना जोरात थोबाडीत मारले होते. स्वतःच्या मुलानेच कानाखाली मारल्यामुळे आईला प्रचंड धक्का बसला. मार जोरात लागला आणि घटनास्थळीच आईचा मृत्यू झाला.

उत्तर भारतातील कावड यात्रा

आईवडिलांना दिसत नाही म्हणून त्यांना कावडीमध्ये घेऊन श्रावण बाळाने तीर्थयात्रा केली. रामायणात हा उल्लेख आहे. जन्मदात्यांची एवढी काळजी घेणाऱ्या श्रावणबाळाविषयी आदर व्यक्त करत दरवर्षी उत्तर भारतातून कावड यात्रा निघते. या यात्रेत चालत चालत हजारो भाविक तीर्थयात्रा करतात. भाविक खांद्यावर बांबूची कावड घेतात. या कावडीच्या दोन टोकांना दोऱ्या बांधून त्याखाली घागर किंवा शिंकाळी ठेवली जाते. कावड यात्रेला निघालेले भाविक या घागरीत पवित्र गंगा नदीचे पाणी भरुन घेतात आणि ते पाणी घरी घेऊन जातात. या पवित्र पाण्याने घरातील देवांची पूजा केली जाते. थोडे पाणी वेगळे कलशात काढून ठेवतात आणि बाकीचे पाणी घरात तीर्थ म्हणून प्राशन केले जाते. 

उत्तर भारतात दरवर्षी कावड यात्रा निघते. या यात्रेतून श्रावण बाळाच्या आठवणींना उजाळा दिला जातो. भाविक श्रावण बाळाप्रमाणे घरातील ज्येष्ठांची अखेरपर्यंत काळजी घेऊ असे वचन देवाला देतात आणि ज्येष्ठांच्या मानसिक आनंदासाठी तसेच घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी पवित्र जल घेऊन घरी येतात. हा एवढा मोठा संस्कार ज्या उत्तर भारतात आहे तिथेच मुलाने मारल्यामुळे आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे अनेकांना धक्का बसला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी