[VIDEO]: पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी आठवतायत का? आता त्यांचा डान्स पाहा!

व्हायरल झालं जी
Updated Jul 27, 2019 | 18:53 IST | टाइम्स नाऊ हिंदी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इलेक्शन ड्युटिवर असलेल्या पिवळ्या साडीतील पिठासीन अधिकारीदेखील चर्चेत राहिल्या. रिना द्विवेदी नावाच्या या निवडणूक अधिकारी आता डान्ससाठीही फेमस झाल्याचं दिसत आहे.

Reena dwivedi
जेव्हा रिना द्विवेदी सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स करतात  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • रिना द्विवेदी यांचा सपना चौधरीच्या गाण्यावर भन्नाट डान्स
  • रिना द्विवेदी पिवळ्या साडीतील त्या निवडणूक अधिकारी
  • लोकसभा निवडणुकीत व्हायरल झाला होता, त्यांचा फोटो

Reena Dwivedi dance on Sapna Choudhary song: यंदाची लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली. पंतप्रधान मोदींवर झालेला राफेल गैरव्यवहाराचा आरोप असेल, ईव्हीएममध्ये गैरप्रकार केल्याची विरोधकांची तक्रार असेल. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची वादग्रस्त वक्तव्य असतील किंवा राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात झालेला पराभव असेल अशा अनेक कारणांनी यंदाची लोकसभा निवडणूक लक्षात राहते. पण, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इलेक्शन ड्युटिवर असलेल्या पिवळ्या साडीतील पिठासीन अधिकारीदेखील तेवढ्याच चर्चेत राहिल्या.

रिना द्विवेदी नावाच्या या निवडणूक अधिकारी इंटरनेटवर खूपच लोकप्रिय झाल्या. तशा त्या सोशल मीडियावर पहिल्यापासूनच अॅक्टिव्ह आहेत. पण, या निवडणुकीच्या निमित्तानं त्या देशभरात पोहोचल्या. एका वर्तमानपत्रात त्यांचा पिवळ्या साडीतील वोटिंग मशीन हातात घेतलेला फोटो छापून आला आणि त्यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. फोटोंच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या द्विवेदींचा आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सपना चौधरीला आव्हान

रिना द्विवेदी या उत्तर प्रदेशात लखनौमध्ये स्थायिक आहेत. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम करतात. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता त्यांची ओळख केवळ सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी अशी राहिलेली नाही. त्यांना आता पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी म्हणून ओळखलं जातं. रिना द्विवेदी या मल्टि टॅलेंटेड प्रकारातील व्यक्ती आहेत. त्या उत्तम एक्सप्रेशन्ससह अतिशय चांगला डान्स करतात. यूट्यूबवर त्यांच्या डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नुकताच त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात त्या हरियाणातील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

सपना चौधरी ही उत्तर भारतात डान्ससाठी प्रसिद्ध असून, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डान्स करून तिनं खूप प्रसिद्धी मिळवली आहे. आता तिच्या गाण्यावर रिना द्विवेदींचा डान्सही लोकप्रिय झाला आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप शेअर केला जातोय. रिना बहुतांशपणे प्लेन साड्यांमध्येच दिसतात. सपना चौधरीच्या गाण्यावर नाचतानादेखील त्या हिरव्या रंगाच्या प्लेनसाडीमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून त्या सपनाला चौधरीला आव्हान देत आहेत, असं त्यांच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये म्हटलंय.

डान्सचा छंद

यापूर्वीही रिना यांनी टिक टॉक व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांनाही खूप चांगली प्रसिद्धी मिळाली होती. तसेच हरियाणातील लोकसंगीतावर यापूर्वीही डान्स केला आहे. एका व्हिडिओमध्ये त्यांनी पिवळ्या रंगाच्या फुलांचा ड्रेस घातला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतरच त्यांना डान्सचा पहिल्यापासून छंद असल्याचं दिसत आहे. सपना चौधरीचा विचार केला तर, तिचं 'तेरी आंखो का ये काजल' हे गाणं खूपच गाजलंय. उत्तर भारतात लग्न समारंभ तसेच पार्टीमध्ये गाण्यांचे कार्यक्रम होतात. त्यात सपना चौधरी ग्रुप डान्स सादर करत असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी