viral video : हत्तीने अशी चालवली स्कूटी

Elephant found scooty on the way then drive like this you would not believe, viral video : हत्ती स्कूटी चालवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Elephant found scooty on the way then drive like this you would not believe, viral video
viral video : हत्तीने अशी चालवली स्कूटी 
थोडं पण कामाचं
  • हत्तीने अशी चालवली स्कूटी
  • व्हिडीओ व्हायरल
  • अननेकांनी बघितला व्हिडीओ

Elephant found scooty on the way then drive like this you would not believe, viral video : हत्ती स्कूटी चालवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लहान मुलं सायकल चालवण्याआधी स्कूटर नावाचे वाहन ज्या पद्धतीने चालवतात काही अंशी तशा पद्धतीने हत्तीने स्कूटी हाताळल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा जेमतेम दहा सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी बघितला आहे. 

हत्ती निवांतपणे चालत होता. अचानक त्याला एक स्कूटी दिसली. ही स्कूटी पाहून हत्तीची उत्सुकता वाढली. आपल्या रस्त्यात ही कोणती वस्तू आहे हे बघण्यासाठी तो स्कूटीजवळ गेला. स्कूटीचे हँडल पाहून हत्तीने सोंडेचा वापर करून हँडल घट्ट धरले. नंतर सोंडेने धरून स्कूटी रस्त्यावरून पुढे नेत हत्ती नव्या खेळाचा आनंद घेऊ लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हत्तीसारख्या मोठ्या प्राण्यासाठी स्कूटी उचलणे अगदी सहज शक्य आहे. व्हिडीओत ते दिसत आहे. पण एरवी हत्ती वाहन चालविताना दिसत नाही. इथे हत्ती स्कूटी हाताळताना, स्कूटीचे हँडल सोंडेने घट्ट धरून स्कूटी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यामुळेच हा व्हिडीओ अनेकजण कौतुकाने बघत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी