आजाराच्या नावाखाली कर्मचारी का घेतात सुट्ट्या? जाणून घ्या

व्हायरल झालं जी
Updated May 13, 2019 | 19:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

कोणत्याही कंपनीत किंवा नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी नेहमी सुट्टी घेतात आणि सुट्टी घेण्यासाठी ते नेहमीच आजारपणाचं कारण देत असतात. हल्लीच यावर करण्यात आलेल्या एका संशोधनात एक मनोरंजक तथ्य समोर आलं आहे. 

Representational Image
आजाराच्या नावाखाली कर्मचारी का घेतात सुट्ट्या? जाणून घ्या 

लंडनः बऱ्याचंदा आपण कंपनीत किंवा नोकरीच्या ठिकाणी काही कर्मचारी खोटं बोलून किंवा आजारी असल्याचं खोटं  कारण सांगून सुट्टी घेत असतात. जर का तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काही कर्मचाऱ्यांच्या सुट्टी घेण्याच्या सवयीला कंटाळाला असाल तर त्यांच्या टीमच्या रचनेवर विचार करा. एका अतिशय मनोरंजक संशोधनात या बाबतचा खुलासा झाला आहे.  ज्या टीममध्ये पुरूषांची संख्या महिलांपेक्षा कमी असते किंवा तरूणांच्या टीममध्ये वयस्कर लोकांची संख्या जास्त प्रमाणात असते. तेव्हा टीममधील महिला आणि वयस्कर लोकं आपल्या अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आठवड्यात जवळपास दोन वेळा सुट्ट्या नक्कीच घेतात. योग्य, कार्यक्षम, बुद्धिमान असल्या कारणानं ते असं करतात. 

जर्मनीचे कॉन्स्टैंज विद्यापीठाचे प्राध्यापक फ्लोरियन कुन्ज आणि मॅक्स रेनवल्ड यांनी नोकरीच्या ठिकाणी अशा कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबद्दल तपास केला जे आपल्या टीममध्ये कमी संख्येनं आहेत. या दोन संशोधनकर्त्यांनी मिळून सात वर्षात प्रसिद्धीस आलेली एक मोठी कंपनी स्विस बेस्ड कंपनीमध्ये ८०० हून अधिक टीमचं निरीक्षण केलं. त्यांनी नवीन टीम मेंबर्सचं वय आणि स्त्री आणि पुरूष यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. 

या दोन्ही संशोधकांना जाणवलं की, पहिल्या टीमचा कोणताही नवीन सदस्य जितका असमान असेल. त्यावेळी तितकाच भेदभाव करणाऱ्या स्थितीमध्ये तो स्वतः जास्त भावनिक होईल. अशाप्रकारची परिस्थिती आल्यास टीमवर्कचं  संकल्पनांना आकार देतात. 

प्राध्यापक फ्लोरियन कुन्ज यांनी सांगितलं की, नोकरीच्या ठिकाणी महिला आणि वृद्ध कर्मचाऱ्यांसाठी आमच्या मनात पहिल्यापासून काही समज बनले आहेत. आम्ही निष्कर्षाच्या रूपात हे म्हणत आहोत की, जिथे पुरूषांचं वर्चस्व जास्त असते तेव्हा महिला आणि तरूण लोकांच्या टीममध्ये वृद्ध, भेदभाव जास्त करतात असा अनुभव आहे. त्यात या भेदभावाची ओळख वेळेनुसार वाढत जाते. 

या संशोधनासाठी २ हजार ७११ लोकांचा अभ्यास करण्यात आला. हे सर्व संशोधन गुप्तपणे करण्यात आलं आहे. फ्लोरियन कुन्ज आणि मॅक्स रेनवल्ड यांनी सल्ला दिला की, संख्येच्या कमतरतेमुळे जे कर्मचाऱ्यांना आरामदायक वाटत नाही, त्यांना जास्त लक्ष आणि समर्थनाची गरज असते. या गरजांसाठी टीम लीडर्संना संवेदनशील आणि नेहमी तयारीनिशी राहणं गरजेचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आजाराच्या नावाखाली कर्मचारी का घेतात सुट्ट्या? जाणून घ्या Description: कोणत्याही कंपनीत किंवा नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी नेहमी सुट्टी घेतात आणि सुट्टी घेण्यासाठी ते नेहमीच आजारपणाचं कारण देत असतात. हल्लीच यावर करण्यात आलेल्या एका संशोधनात एक मनोरंजक तथ्य समोर आलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola