Empty Plastic Bottles: रिकामी प्लास्टिकची बॉटल द्या आणि करा मोफत प्रवास; इथे सुरू आहे स्कीम

Viral News In Marathi | प्लास्टिक प्रदूषण हा विषय जगासाठी डोकेदुखी बनला आहे. अनेक देशांची सरकारे प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी अनेक विविध प्रकारचे नियम बनवण्यात आले आहेत. मात्र जोपर्यंत जनता जागरूक होत नाही, तोपर्यंत या समस्येवर तोडगा निघू शकत नाही.

Empty Plastic Bottles Give away empty plastic bottles and make free travel
रिकामी प्लास्टिकची बॉटल द्या आणि करा मोफत प्रवास  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्लास्टिक प्रदूषण हा विषय जगासाठी डोकेदुखी बनला आहे.
  • यूएईची राजधानी अबु धाबी मधील नगरपालिका आणि परिवहन विभागाच्या एकात्मिक परिवहन केंद्राने सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
  • या उपक्रमाला 'प्लास्टिकसाठी गुण' 'द बल टॅरिफ' असे नाव देण्यात आले आहे.

Viral News In Marathi | नवी दिल्ली : प्लास्टिक प्रदूषण हा विषय जगासाठी डोकेदुखी बनला आहे. अनेक देशांची सरकारे प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी अनेक विविध प्रकारचे नियम बनवण्यात आले आहेत. मात्र जोपर्यंत जनता जागरूक होत नाही, तोपर्यंत या समस्येवर तोडगा निघू शकत नाही. अशा परिस्थितीत प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सरकार जनतेसाठी नवनवीन घोषणा करत असते. असाच एक उपक्रम संयुक्त अरब अमिरातीने (UAE) घेतला आहे. (Empty Plastic Bottles Give away empty plastic bottles and make free travel). 

अधिक वाचा : तीन महिन्यात मुंबईतील कामाठीपुराचं बदलणार रुप

ITC ने केली घोषणा

'खलीज टाइम्स' मध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, यूएईची राजधानी अबु धाबी मधील नगरपालिका आणि परिवहन विभागाच्या एकात्मिक परिवहन केंद्राने (ITC) सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. रिकाम्या प्लास्टीक बाटल्यांच्या बदल्यात त्यांना मोफत प्रवास मिळेल. 

प्रत्येक बॉटलवर मिळणार गुण 

यासाठी प्रवाशांना प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा कराव्या लागणार आहेत. प्रत्येक रिकाम्या प्लास्टिक बाटलीसाठी गुण दिले जातील. हे गुण सार्वजनिक परिवहन बसमध्ये (Public Transport Bus) भाडे म्हणून वापरले जाऊ शकतात.

अधिक वाचा : या तारखांना जन्मलेल्या लोकांसाठी हा आठवडा असणार खास

मशीन लावली जाणार 

लक्षणीय बाब म्हणजे या उपक्रमाला 'प्लास्टिकसाठी गुण' 'द बल टॅरिफ' असे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात अबुधाबीच्या मुख्य बस स्थानकात प्लास्टिक डिपॉझिट मशीन बसवण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांना प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्स जमा करता येणार आहेत. लहान बॉटलला (६०० मिली किंवा त्याहून कमी) १ गुण मिळेल. मोठ्या प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा ६०० मिली पेक्षा जास्त पाणीसाठी होत असलेल्या बाटल्यांना २ गुण मिळतील. तर १० गुण दिरमहाच्या बरोबरीचे मानले जातील. 

EAD ने सुरू केली योजना

ही योजना पर्यावरण एजन्सी-अबू धाबी, अबू धाबी कचरा व्यवस्थापन केंद्र 'तडवीर' आणि 'डिग्रेड' यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. प्रमुख स्थानांवर एकात्मिक बाटली परत करण्याची योजना सुरू करण्यासाठी EAD सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील त्यांच्या भागीदारांसोबत जवळून काम करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी