ESPN Shocking Video: लाइव्ह शो दरम्यान गेस्टवर पडला टीव्ही स्टुडिओचा सेट,  मग काय झाले पाहा 

कोलंबियामधील (Colombia) ईएसपीएन एफसी रेडिओच्या (ESPN FC Radio) प्रसारण कार्यक्रमाच्या वेळी, स्टुडिओ सेटचा (Studio Set) एक भाग तेथील एका पॅनेलच्या सदस्यावर (Panelist) पडला.

espn shocking video part of tv set collapses on carlos orduz
ESPN Shocking Video: लाइव्ह शो दरम्यान गेस्टवर पडला टीव्ही स्टुडिओचा सेट,  मग काय झाले पाहा  

थोडं पण कामाचं

  • ईएसपीएनच्या लाइव्ह शो  (Live Show)दरम्यान असा अपघात झाला की सर्वांनाच धक्का बसला.
  • ईएसपीएन एफसी रेडिओच्या (ESPN FC Radio) प्रसारण कार्यक्रमाच्या वेळी, स्टुडिओ सेटचा (Studio Set) एक भाग तेथील एका पॅनेलच्या सदस्यावर (Panelist) पडला.
  • अपघातात पीडितेचे नाव कार्लोस ऑर्डुझ  (Carlos Orduz)आहे.

ईएसपीएनच्या लाइव्ह शो  (Live Show)दरम्यान असा अपघात झाला की सर्वांनाच धक्का बसला. खरं तर, कोलंबियामधील (Colombia) ईएसपीएन एफसी रेडिओच्या (ESPN FC Radio) प्रसारण कार्यक्रमाच्या वेळी, स्टुडिओ सेटचा (Studio Set) एक भाग तेथील एका पॅनेलच्या सदस्यावर (Panelist) पडला. थेट शो दरम्यान अचानक झालेल्या अपघातानंतर तेथे उपस्थित अँकर आणि इतर पॅनेलचा सदस्यांना काहीच कळले नाही आणि त्यांची भंबेरी उडाली.  बातमीनुसार, अपघातात पीडितेचे नाव कार्लोस ऑर्डुझ  (Carlos Orduz)आहे.

कार्लोस ऑर्डुज हा ईएसपीएन कोलंबियामधील पत्रकार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार कार्लोस ऑर्डुज सुरक्षित आहे. या अपघातात त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आतापर्यंत 11 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. दुसरीकडे, अपघातानंतर कार्लोस ऑर्डुजने तब्येतीची काळजी घेणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले. तो म्हणाला की या क्षणी तो उपचार घेत आहे आणि त्याला बरे वाटत आहे. तो म्हणाले की वैद्यकीय तपासणीत कोणतीही गंभीर समस्या आढळली नाही. या अपघातातून वाचल्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी