Shocking: चुकून जरी निळी किंवा टाइट जीन्स घातली तर थेट फासावर

Jeans Ban In North Korea: जगातील सर्वात गुप्त देशांपैकी एक असलेल्या उत्तर कोरियामध्ये निळी जीन्स आणि घट्ट (Tight) जीन्स घालण्यावर पूर्णपणे बंदी आहे. चुकूनही कोणी या बंदीच्या विरोधात गेले तर त्याला थेट फाशीची शिक्षा दिली जाते.

even if you wear blue or tight jeans by mistake you will get death penalty directly north korea kim jong un
चुकून जरी निळी किंवा टाइट जीन्स घातली तरी थेट फाशी  |  फोटो सौजन्य: People
थोडं पण कामाचं
  • उत्तर कोरियामध्ये निळ्या जीन्सनंतर टाइट जीन्सवर घालण्यात आली आहे बंदी
  • उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगला वाटायचं अश्लील
  • उत्तर कोरिया हा जगातील सर्वात गुप्त देशांपैकी एक

Jeans Ban In North Korea: उत्तर कोरिया: तुम्ही देशातील आणि जगातील अनेक प्रकारच्या कायद्यांबद्दल ऐकले असेल. पण तुम्ही कधी अशा कायद्याबद्दल ऐकले आहे का की निळी किंवा घट्ट जीन्स घालणे हा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात गुप्त देशांपैकी एक असलेल्या उत्तर कोरियामध्ये (North Korea) निळी जीन्स (Blue Jeans) आणि घट्ट जीन्स (Tight Jeans) घालण्यावर पूर्णपणे बंदी आहे. जर चुकूनही कोणी या बंदीच्या विरोधात गेले तर त्याला थेट फासावर लटकवण्याची (death penalty) शिक्षा दिली जाते.

घट्ट जीन्स घातली की थेट फासावर जाल!

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने (Kim Jong UN) आपल्या देशात अनेक हास्यास्पद नियम केले आहेत. या नियमांमध्ये निळ्या आणि घट्ट जीन्सवर देखील बंदी घालण्यात आली आहे. हा नियम मोडल्यास गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होते. किम जोंगच्या नजरेत या चुकीबद्दल माफी नाही. उत्तर कोरियामध्ये नागरिकांना आपल्या मर्जीनुसार केसही कापता येत नाहीत. उत्तर कोरियामध्ये पुरुष आणि महिलांना केवळ 28 प्रकारचे केस कापण्याची परवानगी आहे. पुरुषांसाठी 18 प्रकारची स्टाइल आणि महिलांसाठी 10 प्रकारचे हेअरकट आहेत. याच्या व्यतिरिक्त नागरिकांनी केस कापले तर त्याला गुन्हेगार ठरवून थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.

अधिक वाचा: KIM JONG UN : उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचा फतवा, जगायचे असेल तर कमी खा

'द सन'च्या रिपोर्टनुसार, इथला हुकूमशहा किम जोंग मानतो की, घट्ट पँट घालणं हे अश्लीलतेचे लक्षण आहे. त्यामुळे येथील वीस ते तीस वयोगटातील तरुणांना अशा पँट न घालण्याचा सक्त ताकीद देण्यात आला आहे. जर कोणी असे कपडे घातलेले दिसले, तर त्याला ताबडतोब अटक केली जाते. यावेळी सुरुवातीला त्याच्याकडून लेखी लिहून घेतलं जातं. ज्यामध्ये असे नमूद केलेले असते की, तो पुन्हा असे कधीही करणार नाही. यानंतरही जर त्या व्यक्तीने पुन्हा टाइट जीन्स परिधान केली तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते. सुरुवातीला हा आदेश महिलांना लागू होता. 

इंटरनेटवर बंदी

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की संपूर्ण जग इंटरनेटवर अवलंबून असताना, उत्तर कोरियातील जनता इंटरनेटचा अजिबात वापर करू शकत नाही. येथील हुकूमशहाने इंटरनेटच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तथापि, हुकूमशहाने फक्त 2G चा वापर कामासाठी आणि शिकण्यासाठी केला आहे. तसेच या देशात कोणीही कोणत्याही पाश्चात्य संगीत वाजवू शकत नाही.

अधिक वाचा: कोरोनाला घाबरला किम जोंग, चीनकडून गुपचूप लस टोचून घेतली! 

असे एक ना अनेक विचित्र नियम किम जोंगने उत्तर कोरियातील नागरिकासाठी तयार केले आहेत. ज्यामुळे येथील नागरीक देखील त्रस्त झाले आहेत. मात्र तरीही राजेशाही कायम असल्याने नागरिकांना आपला संताप व्य्क्त करता येत नाही. कारण तसं केल्यासही थेट मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाते.

(1) Indian star tortoise | डोंबिवलीत आढळला दुर्मिळ ‘इंडियन स्टार बॅग’जातीचे कासव - YouTube

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी