Optical Illusion: फोटोत लपलेला प्राणी शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम; तुम्हाला दिसला का?

Find The Animal । ऑप्टिकल इल्युजन म्हणजे 'डोळ्यांची फसवणूक. ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो पाहताना आपली नजर कुमकवत आहे किंवा ते डोळ्यांची परीक्षा तर घेत नाहीत ना असा भास आपल्याला होतो.

Everyone is failing to find the animal hidden in the photo
फोटोत लपलेला प्राणी शोधताना सगळ्यांना फुटतोय घाम, पाहा फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फोटोत लपलेला प्राणी शोधताना सगळ्यांना फुटतोय घाम.
  • ऑप्टिकल इल्युजन म्हणजे 'डोळ्यांची फसवणूक.
  • ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Find The Animal । मुंबई : ऑप्टिकल इल्युजन म्हणजे 'डोळ्यांची फसवणूक. ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो पाहताना आपली नजर कुमकवत आहे किंवा ते डोळ्यांची परीक्षा तर घेत नाहीत ना असा भास आपल्याला होतो. खर तर हे सगळं डोळ्यांच्या फसवणुकीमुळे घडते. फक्त ती गोष्ट पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांना थोडा ताण द्यावा लागतो. सध्या सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत जे लोकांच्या डोळ्यांची परीक्षा घेत आहेत. (Everyone is failing to find the animal hidden in the photo). 

अधिक वाचा : सकाळच्या वेळी केलेल्या या चुका खराब करू शकतात संपूर्ण दिवस

दरम्यान, सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा फोटो ऑप्टिकल इल्युजनचे अचूक चित्रण मांडत आहे. हे चित्र एका जंगलाचे आहे, ज्यामध्ये एक मोठा प्राणी लपलेला आहे. जरी हा प्राणी लोकांना सहज दिसत नाही. अनेकजण तासनतास हे चित्र पाहत असतात आणि त्या प्राण्याचा शोध घेण्यासाठी डोळ्यांना ताण देत असतात. यानंतरही त्या लोकांना चित्रात लपलेला प्राणी दिसत नाही.

फोटोत लपले आहे जिराफ 

सोशल मीडियावर हा फोटो समोर आल्यापासून अनेक युजर्स हा फोटो आपल्या नातेवाईकांना पाठवून त्यांच्या डोळ्यांची परीक्षा घेत आहेत. जर तुम्ही अजूनही चित्रात लपलेला प्राणी पाहिला नसेल, तर आम्ही तुम्हाला हा प्राणी शोधण्यात मदत करतो. कारण या फोटोमध्ये एक जिराफ पाहायला मिळत आहे. जर तुम्ही तुमचे मन एकाग्र करून एकाग्रतेने चित्राकडे पाहिले तर तुम्हाला चित्रात लपलेला जिराफ नक्कीच दिसेल. खर तर झाडांनी भरलेल्या या जंगलाच्या चित्रात अनेक सुकलेली झाडे आहेत. जिराफ अशा प्रकारे उभे आहे की ते सुकलेल्या झाडांमध्ये लपले आहे.


 
इथे पाहा जिराफ 

Giraffe Viral Photo

लक्षणीय बाब म्हणजे आत्तापर्यंत अनेकांनी हे कोडे सोडवण्यात रस दाखवला आहे, परंतु चित्रात दडलेला जिराफ शोधण्यात भल्याभल्यांना घाम फुटला आहे. मात्र काही लोक आहेत जे जिराफ अगदी सहज शोधण्यात यशस्वी होत आहेत. तुमच्या डोळ्यांना अजूनही जिराफ सापडला नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी आणखी एक चित्र खाली दिले आहे. लाल वर्तुळात तुम्ही जिराफ सहज शोधू शकता. चित्राच्या उजव्या बाजूला झाडाजवळ उभा असलेला जिराफ तुम्हाला दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी