Optical illusion: या झुडपात लपला आहे एक लांडगा; शोधताना भल्याभल्यांना फुटतोय घाम

व्हायरल झालं जी
Updated Jun 13, 2022 | 12:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Optical illusion viral Photo । सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे जो पाहून सगळेच विचारात पडले आहेत.

Everyone is sweating to find the wolf hiding in the bushes
झुडपात लपलेला लांडगा शोधताना सगळ्यांना घाम फुटला, पाहा फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो व्हायरल होत आहे.
  • झुडपात लपलेला लांडगा शोधताना सगळ्यांना घाम फुटला.
  • या फोटोंमध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने देण्यात आली आहेत.

Optical illusion viral Photo । मुंबई : सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट आणि अनोखे फोटो व्हायरल होत असतात. यामधील काही फोटो आपल्याला हसवतात तर काही फोटो विचार करण्यास भाग पाडतात. लक्षणीय बाब म्हणजे व्हायरल होणाऱ्या काही फोटोंवर तर विश्वास देखील ठेवणे कठीण असते. तर काही फोटोंमुळे मोठा गोंधळ निर्माण होतो, ज्याचे सत्य लोकांना सहजपणे समजत नाही. असे फोटो ऑप्टिकल इल्युजनचे असतात. सध्या असाच एक फोटो खूप व्हायरल होत आहे आणि युजर्स याच्यावर अनेक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. (Everyone is sweating to find the wolf hiding in the bushes). 

अधिक वाचा : सूर्यदेवाला अर्घ्य देताना घ्या या गोष्टींची विशेष काळजी

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने देण्यात आली आहेत. आज आपण अशाच एका आव्हानात्मक फोटोबद्दल भाष्य करणार आहोत, ज्यामध्ये लोकांना लांडग्याला शोधण्याचे चॅलेंज करण्यात आले आहे. बहुतांश लोक लांडगा शोधण्यात अयशस्वी झाले आहेत. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की तिथे एक झुडूप आहे आणि त्यात एक लांडगा शांतपणे उभा राहिला आहे. जे सहजासहजी लोकांना दिसत नाही. हा लांडला शोधताना भल्याभल्यांना घाम फुटत आहे. 

Wolf Viral Photo

चालवा अक्कल लढवा शक्कल

मग तुम्ही लांडगा शोधण्यात यशस्वी झालात का? काही लोकांनी लांडगा पाहिला असेल, तर काहीजण अद्यापही विचारात पडले असतील. या फोटोत लांडग्याला शोधण्यासाठी २० सेकंदांचा कालावधी देण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे अद्यापही तुम्हाला लांडगा दिसला नसेल तर फोटो थोडा झूम करा आणि बाजूला थोडे काळजीपूर्वक पाहा. तुम्हाला लांडगा दिसेल. लांडगा समोर तोंड करून उभा असल्याचे पाहायला मिळेल. पांढऱ्या रंगाचा असलेला लांडगा शोधताना सगळ्यांनाच घाम फुटत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी