परपुरुषासोबत सेक्स केल्याने महिलेला दिली भयंकर शिक्षा, ती देखील सर्वांसमोर! 

विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या एका महिलेला अत्यंत भयंकर शिक्षा देण्यात आली आहे. पाहा काय आहे हे संपूर्ण प्रकरण 

extremely unlawful punishment of a woman for having sexual relations outside marriage in front of everyone
परपुरुषासोबत सेक्स केल्याने महिलेला दिली भयंकर शिक्षा, ती देखील सर्वांसमोर!  (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

जकार्ता: आठ जणांसह एका महिलेला सर्वांसमोर  चाबकाचे फटके मारल्याची एका घटना नुकतीच उघडकीस आली आहे. इंडोनेशियात शरीया  कायदा तोडल्याबद्दल आणि नैतिकतेचे उल्लंघन केल्याबद्दल महिलेस शिक्षा झाली आहे. यावेळी आरोपी महिला ही पांढऱ्या कपड्यात गुडघ्यावर बसलेली दिसून आली. त्याचवेळी एक महिला पोलिसही तिच्याबरोबर स्टेजवर हजर होती.

इंडोनेशियातील गुन्हेगारी विभागाच्या अहवालानुसार पोलिसांकडून शिक्षा करण्यासाठी लांब काठी वापरली गेली आणि दोषींना २५ ते ४५ फटके मारण्याची शिक्षा  देण्यात आली आहे.

कथित स्वरुपात महिलेने नैतिक आचारांचं उल्लंघन करुन विवाहबाह्य संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली या महिलेला ही भयंकर शिक्षा देण्यात आली आहे. विवाहबाह्य संबंध ठेवणं हे इस्लाममधील शरिया कायद्याविरूद्ध आहे. महिलेनंतर तिच्याशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषालाही हीच शिक्षा देण्यात आली. हे प्रकरण इंडोनेशियातील आचे प्रांतातून समोर आली आहे.

शरिया कायद्यात समलैंगिक संबंध, उभयलिंगी संबंध आणि विवाहबाह्य संबंध हे गुन्हे म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाने बाली येथे जाणाऱ्या आपल्या देशातील नागरिकांना या कायद्याबद्दल इशारा दिला होता.

बाली बेटावर कठोर कायदे: बाली येथे इंडोनेशियन कायदे अस्तित्वात आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन कठोर कायदे लागू करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने आपल्या नागरिकांना प्रवासाबाबत माहिती अपडेट केली असून त्यांना चेतावनी देत असं म्हटलं आहे की, बाली येथे  पुढील आठवड्यात कायदेशीर बदल होणं अपेक्षित आहे.

ऑस्ट्रेलियातील अनेक जण हे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बालीला मोठ्या संख्येने जातात. बालीत  कायदा बदलल्यानंतर विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर बंदी घातली जाईल, तसेच समलिंगी संबंधांवरही बंदी घातली जाईल आणि गर्भनिरोधक आणि गर्भपातापर्यंत करणाऱ्यांवर कठोर शिक्षा केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...