Viral Video: सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल (Video viral in social media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसत आहे. कारण, या व्हिडिओत नागरिकांनी असं काही केलं आहे की जे पाहून तुम्हीही म्हणाल हे तर आपल्या मृत्यूला आमंत्रण देत आहेत. या नागरिकांचे नशीब बलवत्तर होते म्हणून कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मात्र, ही चूक जीवावर बेतली असती. (family crossing railway track and suddenly speeding train arrive Shocking video viral)
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसत आहे की, एक एक्सप्रेस ट्रेन काही कारणास्तव स्टेशनपूर्वीच एका ठिकाणी थांबलेली आहे. कदाचित सिग्नल मुळे ही एक्सप्रेस थांबली असावी. मात्र, त्याच दरम्यान काही प्रवासी ट्रेनमधून आपल्या सामानासह एक्सप्रेसमधून खाली उतरतात आणि रेल्वे ट्रॅक ओलांडून पलीकडे जाताना दिसत आहेत.
ज़िंदगी आपकी है. फ़ैसला आपका है. pic.twitter.com/eMrl65FiCj — Awanish Sharan (@AwanishSharan) July 19, 2022
अधिक वाचा : वारंवार जुळ्यांना जन्म देणाऱ्या मातेच्या बाबतीत घडली अनपेक्षित घटना
रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्यांमध्ये लहान मुले, वयोवृद्ध, महिला दिसून येत आहेत. एक एक कुटुंब जसं रेल्वे ट्रॅक करून आपलं सामान दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत असंत तितख्यात समोरून धडाधड वेगाने दुसरी एक्सप्रेस ट्रेन येते. भरधाव ट्रेन पाहून नागरिकांमध्ये गोंधळ उडतो आणि सर्व आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करु लागतात. एक महिला तर थोडक्यात बचावली आहे.
Rickshaw ke 20 rupaye bachaane wala India. pic.twitter.com/6lCHNcjGOm — Gabbbar (@GabbbarSingh) July 19, 2022
अधिक वाचा : Viral Video : पतीच्या मोबाईलमध्ये वाजला अलार्म, पत्नीने ‘असं’ झोपवलं की पुन्हा उठलाच नाही
हा व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज वर्तवू शकता की ही घटना किती गंभीर आहे. या नागरिकांचं नशीब बलवत्तर होतं म्हणून कुठलीही जिवितहानी झालेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आयएएस अवनीश शरण यांनी लिहिलं, "आयुष्य तुमचं आहे, निर्णय तुमचा आहे". तर एका युजरने लिहिलं, "रिक्षाचे २० रुपये वाचवणारा भारत".
अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे आणि आतापर्यंत लाखो व्ह्यूव्ज या व्हिडिओला मिळाले आहेत. अशा प्रकारे रेल्वे ट्रॅक ओलांडू नका असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र, तरीही नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच कळवा.