Brainy Farmer : शास्त्रज्ञापेक्षाही हुशार शेतकरी, पक्ष्यांना हाकलण्यासाठी केला जबराट जुगाड, पाहा VIDEO

एका शेतकऱ्याने शेतात येणारे पक्षी पळवून जाण्यासाठी घरगुती वस्तूंच्या जुगाडातून एक यंत्र तयार केलं. या यंत्राचं सध्या जोरदार कौतुक होत आहे.

Brainy Farmer
शास्त्रज्ञापेक्षाही हुशार शेतकरी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शेतकऱ्याने बनवलं पक्षी पळवणारं यंत्र
  • घरगुती वस्तू वापरून लावला भन्नाट शोध
  • यंत्राचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Brainy Farmer : शेतात (Farm) लावलेल्या पिकाची (Crop) जपणूक (Protection) करण्यासाठी शेतकरी (Farmer) अनेक उपाय करत असतात. विशेषतः शेतात अचानक येणारा पक्ष्यांचा थवा (Birds) पिकांचं मोठं नुकसान करून जातो. त्यासाठी अनेक शेतकरी शेतात बुजगावणं उभं करत असतात. एका काठीवर शर्ट आणि पँट घातलेली माणसाची प्रतिकृती उभी कऱण्याचा हा प्रयत्न असतो. शेतात जणू एखादा माणूसच उभा आहे, असं वाटल्यामुळे पक्षी तिकडे फिरकणार नाहीत, या उद्देशाने बुजगावणी उभी केली जातात. मात्र या बुजगावण्यांचा दरवेळी उपयोग होतोच असं नाही. या बुजगावण्याचा अंदाज आल्यानंतरप पक्ष्यांची भीड चेपते आणि शेतीचं नुकसान व्हायला सुरुवात होते. हा प्रकार टाळण्यासाठी एका शेतकऱ्यानं आपल्या मेंदूचा वापर करत एक अनोखं यंत्र तयार केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Techzexpress (@techzexpress)

घरगुती वस्तूंचा वापर

शेतकऱ्यानं तयार केलेली ही वस्तू पाहून तुम्हीही त्याचं तोंडभरून कौतुक कराल. एखाद्या शास्त्रज्ञापेक्षाही याचा मेंदू तल्लख असल्याची शाबासकीदेखील तुम्ही द्याल. पक्ष्यांना पळवण्यासाठी या शेतकऱ्यानं एक अनोखं यंत्र तयार केलं आहे. नेहमी आपल्या घरातच पडून असणाऱ्या वस्तू वापरून त्याने पक्षी पळवण्यासाठीचा उपाय केला आहे. यामध्ये एक लाकडाचं स्टँड, एक लोखंडाचं भांडं आणि छोटीशी विंडमिल यांचा उपयोग करत त्यानं एक यंत्र तयार केलं आहे. या यंत्राचा आता त्याला चांगलाच उपयोग होत आहे. 

अधिक वाचा - Inspirational Story : आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी लेकीला काढलं घराबाहेर, आजीकडे राहून मिळवले 99.4%, डोळ्यांत पाणी आणणारी गोष्ट

आवाजाने पक्षी पळतात दूर

शेतकऱ्याने त्याच्या शेतात लावलेल्या या यंत्रामुळे पक्षी आता तिकडे फिरकतही नाही. या यंत्राचा जोरदार आवाज येत राहतो. विंडमिलमुळे आपोआप हे यंत्र आवाज करत राहतं आणि पक्ष्यांना तिथून दूर पळायला भाग पाडतं. पक्ष्यांसाठी हा आवाज खूपच जास्त असल्यामुळे या आवाजाने ते घाबरतात आणि दूर निघून जातात. दर काही सेकंदांनी हे मशीन वाजतं आणि मोठी घंटा वाजल्यासारखा आवाज तयार होतो. याचा फायदा शेतकऱ्याला होत असून पक्ष्यांमुळे होणारं शेतीचं नुकसान टाळण्यात त्याला यश मिळत असल्याचं दिसून येत आहे. 

अधिक वाचा - Please slow down : चिखलातून वेगाने गाडी चालवणाऱ्यांनो, जरा विचार करा! या मुलीचा फोटो पाहून वाटेल वाईट!

व्हिडिओ होतोय व्हायरल

शेतकऱ्याच्या या कल्पनेचं सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. आतापर्यंत शेतात येणाऱ्या पक्ष्यांना कसं हाकलावं, या विचाराने हैराण झालेल्या अनेक शेतकऱ्यांना या कल्पनेमुळे नवी प्रेरणा मिळाली आहे. अगदी घरगुती स्वरुपाच्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरून असं यंत्र तयार करता येऊ शकतं, हे सिद्ध झाल्यामुळे आता इतरही अनेक शेतकरी असं यंत्र बनवू शकतील. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी