तुमच्या डान्सचे ठुमके जरा कमी करा की, तरुण शेतकऱ्यानं गौतमी पाटीलला लिहिलं लेटर

व्हायरल झालं जी
Updated Apr 17, 2023 | 17:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gautami Patil Latter Viral:संपूर्ण महाराष्ट्रात एकच नाव फेमस झालं आहे ते म्हणजे 'सबसे कातील गौतमी पाटील'. (Lavani Dancer Gautami Patil) लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil Dance Video) हिनं अल्पावधीत सगळ्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात (Maharashtra news) गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. पण नृत्य करताना गौतमी अश्लिल हावभाव करते, अशी तिच्यावर टीका देखीव होत आहे. अशातच एका तरुण शेतकऱ्यानं गौतमीला पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्याचं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल (Viral News)होत आहे.

Gatami Patil Dance Video Viral
तरुण शेतकऱ्यानं गौतमी पाटीलला लिहिलं लेटर  |  फोटो सौजन्य: Times Now

Gautami Patil Viral Letter: लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्रभरात गौतमीचे (Maharashtra news) कार्यक्रम हाऊसफुल्ल आहेत. गौतमीनं अक्षरश: तरुणाईला (Gautami Patil Dance Video)  वेड लावलं आहे. अशातच एका तरुण शेतकऱ्यानं गौतमी पाटील हिला पत्र लिहिलं आहे. राज्यातील सद्य परिस्थितीवर तरुण शेतकऱ्यानं आपल्या पत्रातून भाष्य केलं असून  तुमच्या डान्सचे ठुमके जरा कमी करा की, असं देखील म्हटलं आहे. श्रीकांत गडळे (रा. बीड)  असं या शेतकऱ्याचं नाव आहे.  श्रीकांतचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात गौतमी पाटील हिनं तिच्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. गौतमीनं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा देखील झाली होती. त्यावरूनच आता श्रीकांत गडळे या शेतकरी पुत्रानं गौतमीला पत्र लिहून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

गौतमीसाठी काय म्हटलंय पत्रात?

श्रीकांत गडळे हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहीफळ, वडमाऊली येथील रहिवासी आहे. श्रीकांतने लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिची चांगलीच कानउघाडणी केली आहे. विशेष म्हणजे श्रीकांतचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'गौतमी पाटीलचे हाल बेहाल, तुमचे चाहते लाखो पण.. 
लग्नाला तयार कोणीच नाही. 
आमच्या महाराष्ट्रात मुलगी लग्नाला आली कि मुलाच्या घरचे मुलींच्या घराचे उंबरठे झिजवतात. 
तरी मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीला लग्न कर म्हणायची वेळ येत नाही. 
गौतमी पाटील तुमचे लाखो चाहते पण.. लग्नाला कोणीच तयार नाही. 
तुमचे ठुमके वर लाखो फिदा, पण लग्नाला कुणीच तयार नाही, जरा आत्मपरीक्षण करा.'
या महाराष्ट्रात चटक मटक भाजी एक दिवस गोड लागते, 
पण पोट व मन भरायला चटणी भाकरी भाजी ठेचाच लागतो. 
हा कृषिप्रधान देश आहे तुमच्या डान्सचे ठुमके कमी करा गौतमी पाटील तुम्ही आत्मपरीक्षण करा. 
खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अयोध्येला निघालेत, 
महाराष्ट्रात विजेचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने पिके गेली, मुकी जनावरे गेली. 
तरी काही तरुणवर्ग तुमच्याच नादात असला आणि लाखो चाहते असले तरी एकही लग्नाला तयार नाही. 
किसान पुत्र श्रीकांत गडळे सांगतो … ठ
इतर शेतकरी पुत्र उपाशी राहतील कापसाला पाणी बकेटने मारतील
पण लग्नाला कोणीच तयार होणार नाही. आत्मपरीक्षण करा...' 

उपवर झालेल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचं वास्तव श्रीकांतनं आपल्या पत्रातून मांडलं आहे. एवढं करून देखील श्रीकांत थांबला नाही. पत्राच्या शेवटी हे पत्र इतके शेअर करा की गौतमी पाटीलपर्यंत पोहचलं पाहिजे, असं देखील श्रीकांतनं आवाहन केलं आहे.
gautami patil dance video, Viral Post, Gautami Patil Latter Viral, Latest Marathi news, Beed news, Shrikant Gadale

नेमकं काय म्हणाली होती गौतमी पाटील?

गौतमी पाटीलनं काही दिवसांपूर्वी एका युट्यूब चॅनेलला इंटरव्ह्यू दिला होता. गौतमीनं यावेळी तिच्या लग्नाविषयी भाष्य केलं होतं. घरातल्या जबाबदाऱ्याचा निम्मा भार उचलण्यासाठी आयुष्यात एक हक्काचा व्यक्ती असावा, असं गौतमीनं म्हटलं होतं. मला लग्न करायचं आहे, अशी इच्छा देखील गौतमी पाटीलनं अप्रत्यक्ष व्यक्त केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी