नदीत बाप लेकीचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा फोटो, जगातून हळहळ व्यक्त 

व्हायरल झालं जी
Updated Jun 27, 2019 | 14:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

अमेरिकेत नदीपार करून प्रवेश करणाऱ्या बाप लेकीचा नदीत बुडून मृत्यू झाला. यावेळी नदी किनारी त्यांचा मिठीतला फोटो खूप व्हायरल होत आहे. जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

father daughter drowned at us mexico border
अमेरिकेत शिरणाऱ्या बाप-लेकीचा बुडून मृ्त्यू. 

सेल्व्हाडोर : जगातील असे काही हृदय पिळवटून टाकणारे फोटो व्हायरल होत असतात. यापूर्वी सिरीयातून स्तरांतरीत झालेल्या एका लहान मुलाचा समुद्र किनारी पडलेल्या मृतदेहाचा फोटो व्हायरल झाला होता. आता मॅक्सिकोचा एक असाचा फोटो व्हायरल होत आहे.  सेल्वहाडोर येथील एक व्यक्ती आणि त्याचा दोन वर्षांच्या मुलीचा फोटो असून तो जगभरात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून कोणाचेही हृदय पिळवटून निघेल. अनेकांनी हा फोटो पाहून हळहळ व्यक्त केली आहे.  निर्वासित अमेरेकेत प्रवेश करत असताना त्यांचा मृत्यू होतो. त्याचे हे ताजे उदाहरण आहे. 

सेल्व्हाडोर  येथील हे बाप लेक रियो ग्रेनेड नदी ओलांडून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. पण असे करत असताना त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आपल्या मुलीला वाचविण्यासाठी त्या बापाने तिला आपल्या टी-शर्टमध्ये ठेवले होते. 

Refugee crisis

ऑस्कर मार्टिन्स हे २५ वर्षीय गृहस्थ आपल्य २१ वर्षीय पत्नी आणि मुलगी व्हॅलेरिया मार्टिन्स  यांच्यासोबत अमेरिकेत जाण्यासाठी सेल्व्हाडोर येथून निघाले होते.  प्राणाची बाजी लावून ते मॅक्सिको मार्गे अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. ऑस्कर यांनी आपल्या मुलीला सुरक्षेच्या कारणास्तव पाठीवर टी-शर्टमध्ये ठेवले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ऑस्कर आणि त्यांची दोन वर्षांची व्हॅलेरिया पाण्यात बुडाली. यावेळी पत्नी सुखरूप वाचली आणि नदी किनारी पोहचली. 

Refugee crisis

पाण्यात वाहून गेल्यानंतर ऑस्कर आणि व्हॅलेरिया यांचा मृतदेह मॅक्सिकोच्या तमौलिपस राज्यातील मटोमोरो येथे नदी किनारी सापडला. या फोटो ऑस्कर आणि व्हॅलेरिया एका नदी किनारी उताणे पडले असून दोघेही मिठीत दिसत आहेत.  या हृदय पिळवटणाऱ्या घटनेनंतर जगभरातून प्रचंड संताप व्यक्त केला. या घटनेचा सेल्व्हाडोर आणि मॅक्सिकोतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येते.   निर्वासितांसंदर्भातील चुकीच्या धोरणामुळे सरकारवर प्रचंड टीका होत आहे. 

Refugee crisis

ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रिया 

मॅक्सिकोत झालेल्या या घटनेचे पडसाद अमेरिकेतही पडत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.  या घटनेवर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अशा प्रकारचे फोटो पाहाणे मलाही आवडत नाही. कदाचित फोटोमध्ये असलेली व्यक्ती ही सर्वोत्तम असावी. अशा घटनांना ट्रम्प यांनी सीमेसंबंधीचे धोरण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

निर्वासितांच्या  त्या फोटोची आठवण... 

Refugee crisis

२०१५ मध्ये एलेन कुर्दी हा सीरियातील निर्वासीत मुलगा समुद्र किनारी मृत अवस्थेत पडला होता. वरील घटनेनंतर या फोटोची आठवण जगभरातील नेटिझन्सला झाली आहे. हा फोटोही हृदय पिळवटून टाकणारा होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
नदीत बाप लेकीचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा फोटो, जगातून हळहळ व्यक्त  Description: अमेरिकेत नदीपार करून प्रवेश करणाऱ्या बाप लेकीचा नदीत बुडून मृत्यू झाला. यावेळी नदी किनारी त्यांचा मिठीतला फोटो खूप व्हायरल होत आहे. जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola