Viral News : ४८ मुलांचा बाप आहे हा तरुण, पण लग्नासाठी मिळत नाही मुलगी, वाचा काय आहे प्रकरण

एका तरुणाला ४८ मुले आहेत आणि त्याचे लग्न ठरत नाहीये. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु ही सत्यपरिस्थिती आहे. एका ३१ वर्षीय तरुणाने स्पर्म डोनेट (Sperm Donate) केले आहे. त्याला एकूण ४८ मुलं आहेत. परंतु त्याचे लग्न (Marriage) ठरत नाही. कारण कुठल्याही मुलीला तो स्पर्म डोनर असल्याचे आवडत नाही.

sperm donor news
स्पर्म डोनर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका तरुणाला ४८ मुले आहेत आणि त्याचे लग्न ठरत नाहीये.
  • परंतु ही सत्यपरिस्थिती आहे. एका ३१ वर्षीय तरुणाने स्पर्म डोनेट केले आहे. त्याला एकूण ४८ मुलं आहेत.
  • परंतु त्याचे लग्न ठरत नाही.

Viral News : एका तरुणाला ४८ मुले आहेत आणि त्याचे लग्न ठरत नाहीये. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु ही सत्यपरिस्थिती आहे. एका ३१ वर्षीय तरुणाने स्पर्म डोनेट (Sperm Donate) केले आहे. त्याला एकूण ४८ मुलं आहेत. परंतु त्याचे लग्न (Marriage) ठरत नाही. कारण कुठल्याही मुलीला तो स्पर्म डोनर असल्याचे आवडत नाही. आता हा तरुण आणखी १० मुलांच बाप होणार आहे.  (father of 48 children cant find girlfriends or groom because of he is sperm donor America news in marathi )

अधिक वाचा : Rakesh Jhunjhunwala Video : व्हीलचेअरवर असतानाही राकेश झुनझुनवालांनी केला होता डान्स, निधनानंतर जुना Video होतोय Viral

अमेरिकेत राहणारा ३१ वर्षाचा तरुण काईल गोर्डी सध्या निराश आहे. कारण लग्नासाठी त्याला मुलगी मिळत नाही. काईल हा स्पर्म डोनर आहे. काईल हा सिंगल मदर, लेस्बियन कपल किंवा ज्या दाम्पत्यांना मुलं होत नाहीत अशा लोकांना आपले स्पर्म डोनेट करतो. स्पर्म डोनेट करण्याची एक प्रक्रिया असते, त्यात स्पर्म डोनेट करण्याचे नाव गुपित ठेवले जाते तसेच क्लिनिकमध्ये जाऊन स्पर्म डोनेट करणे अपेक्षित असतं. परंतु काईल त्याच्याकडे मदत मागणार्‍या लोकांना मोफत स्पर्म डोनेट करतो. क्लिनिकमधून स्पर्म घेतल्यास आपल्या मुलांचा बाप कोण आहे हे अनेक कपल्स आणि महिलांना जाणून घ्यायचे असते. परंतु कायदेशीर तसे शक्य नसल्याने काईल त्यांना मदत करतो.

अधिक वाचा : लेडी डॉक्टरच्या प्रेमात पडला चिमुकला पेशंट, लाखो नेटिझन्सनी बघितलेला Video तुम्ही पाहिला का?

काईल जरी आता ही समाजसेवा करत असला तरी ही समाजसेवा त्याच्या अंगाशी येत आहे. कारण कुठलीही मुलगी लग्न सोडा अगदी रिलेशनशिपमध्ये येण्यासही नकार देत आहेत. काईल आपल्या नात्यामध्ये कुठलेही खोट सांगत नाही किंवा कुठलीही बाब लपवून ठेवत नाही. पहिल्याच भेटीत तो आपण स्पर्म डोनेट करत असल्याचे सांगतो आणि मुलींना बाब पसंत पडत नाही.  गेल्या ८ वर्षांत काईलने ४८ महिलांना स्पर्म डोनेट केले आहेत. सर्व महिलांना सुदृढ मुलं झाली आहेत. आताही काईलने १० महिलांना आपले स्पर्म डोनेट केले असून त्या गरोदर आहेत. 

अधिक वाचा : Kiss to Cobra : तरुणीनं कोब्राला किस करण्यासाठी चेहरा जवळ नेला आणि… पाहा VIDEO


गेल्या १० वर्षांपासून आपण रिलेशनशीपमध्ये नसल्याचे काईलने म्हटले आहे. महिलांना अशा प्रकारे मदत करणे मुलींना आवडत नाही, तसेच एका व्यक्तीला ४८ मुलं आहेत किंवा तो स्पर्म डोनेट करतो अशा व्यक्तीसोबत राहण्यास मुलींचा नकार असतो असे काईलने सांगितले. ८ वर्षांपूर्वी एका समलैंगिक महिला दाम्पत्यांनी त्याला स्पर्म डोनेटसाठी गळ घातली होती. तेव्हापासून त्याचा वीर्यदान करण्याचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर काईलला ऑनलाईन अनेक रिक्वेस्ट आल्या आणि त्याने स्पर्म डोनेट करण्यास सुरूवात केली. 

अधिक वाचा : Optical Illusion: ३० सेकंदात शोधून दाखवा कोंबडीचे पिल्लू, भल्या भल्यांनी सुटला घाम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी