लांडोर खरंच अश्रू पिवून गर्भवती होते? गुगलवर आहेत वेगवेगळी उत्तरे; काय आहे सत्य जाणून घ्या

मोर (peacock)-लांडोर ( Female peacock )वरुन अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. आज आपण ज्या गोष्टी चर्चा करत आहोत त्यावरुन अनेक अफवा ह्या गुगलवर देखील उपलब्ध आहेत. लोक त्याविषयी जाणून घेण्यासाठी गुगल (Google) बाबाच उपयोग करतात, परंतु तेथे देखील खरे उत्तर नसल्याने अनेकांना याबाबत रहस्य माहिती नाहिये. काही जाणकारांनी गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे जंगलाचे गूढ आणखी वाढले. दरम्यान काही कॅमेरे आणि छायाचित्रकारांनी मोर आणि लांडोर (Female peacock) याचे काही फोटो Photo शेअर केले आ

 How do peacocks have chicks? Does Landor get pregnant by drinking tears?
मोराला पिल्लं कशी होतात? लांडोर अश्रू पिवून गर्भवती होते?  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मोर आणि लांडोरच्या संभोगाविषयी अनेक प्रकारच्या चर्चा आहेत.
  • लांडोर अश्रु पिवून गर्भवती राहते असा समज आहे.
  • न्यायाधीशांनी मोराला म्हटलं ब्रह्मचारी पक्षी.

नवी  दिल्ली:  भूतलावरील अनेक प्राण्याची (animal) माहिती आपल्याला आहे. परंतु जंगलात (forest) असे काही पक्षी ( bird)आणि प्राणी आहेत, ज्यांच्याविषयी आपल्याला खूप अल्पशी माहिती असते. तर काही रहस्य म्हणून आपण आपल्या डोक्यात त्या ठेवत असतो. आपला राष्ट्रीय पक्षी (National bird) मोराविषयी सुद्धा अनेक रहस्य बनली आहेत. तसेच काही अफवा प्रचिलीत आहेत. मोराला (peacock) पिल्लं कशी होतात, ते संभोग करतात का अशी अनेक प्रश्न आहेत. ज्याची उत्तर आपल्याला माहिती नाहीत. जे माहिती आहेत, त्या कथित आहेत, किंवा अफवा आहेत. आपण आज जाणून घेणार आहोत की लांडोर  (Female peacock) गर्भवती (pregnant) कशा होत असतात.  (Female peacock really got pregnant by drinking tears? There are different answers on Google. Know the truth)

अधिक वाचा  :  Daily Horoscope: कसा असेल सोमवारचा दिवस, जाणून घ्या

दरम्यान बहुतेकांनी वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. एका प्रसिद्ध कथा वाचकाने सांगितलं की, मोर कधीच शारिरिक संभोग करत नाहीत. लांडोर आणि मोर रडतात आणि लांडोर ते अश्रू पिते आणि त्यातून ती गर्भवती राहते. याचमुळे भगवान श्रीकृष्ण मोराचे पीस हे आपल्या डोक्याला लावतात. कथा वाचक दावा करत असलेल्या या गोष्टीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर उपलब्ध आहे. परंतु ते सत्य नाहीये. 

अधिक वाचा  :  विरोधकांच्या प्रश्नांनी हुडहुडी भरणार की तापमान वाढणार?

विशेष म्हणजे गुगलवरही मोरआणि लांडोरच्या संभोगाविषयी अनेक प्रश्न- उत्तरे देण्यात आली आहेत. मोर एक पक्षी आहे जे अंडे देत नाही, ते पिल्लांना कसे जन्म देतात. काय खरंच ते अश्रु पिवून गर्भवती होत असतात का?. काय खरंच मोर आणि लांडोर संभोग करत नाहीत का?. मोराचे अश्रू पिऊन मोराची गर्भधारणा होते का? हे प्रश्न वाचून तुमचं डोकं चक्रावून जाईल. परंतु खरं काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मोरांच्या गोष्टींविषयी आपला एवढा मोठा गोंधळ वाढलाय की, एक न्यायाधीशाने देखील एकदा म्हटलं होतं की, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मोर हा राष्ट्रीय पक्षी का आहे, कारण तो ब्रह्मचारी राहतो. मोराच्या अश्रूंमुळे लांडोर गरोदर होत असते.  हा गोंधळ आता कमी-कमी होऊ लागलाय कारण काही मोबाईल कॅमेऱ्यांनी मोर आणि लांडोरच्या मिटिंगचे काही दृश्य आपल्या समोर आणली आहेत. 

अधिक वाचा  : फीफा विश्वकपाच्या विजयानंतर मेस्सीचं मन बदललं
यामुळे आपला भ्रम दूर झाला आहे. मोर आणि लांडोर देखील इतर प्राण्याप्रमाणे प्रजनन करतात. परंतु मोबाईल कॅमेरे येईपर्यंत फार कमी लोक हे पाहू शकत होते, त्यामुळे अफवांना बळ मिळाले. विशेष म्हणजे की, शास्त्रज्ञांनीही याविषयी कधीच बरोबर माहिती दिली नाही. दरम्यान, तुम्हाला एक मनोरंजक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की काही पक्षी एका विशिष्ट प्रकारचे 'चुंबन' सह सोबती करतात. याला इंग्रजीत क्लोकल किस cloacal kiss म्हणतात.

दरम्यान, मोर ब्रह्मचारी आहे, लांडोर अश्रु पिवून गर्भवती राहत असल्याचा दावा हा खोटा आहे. मोर आणि लांडोर या पक्ष्याचे प्रजनन हे इतर पक्ष्यांप्रमाणे होत असते. मोरांसह सर्व पक्षी संभोग करतात तेव्हा नर पक्षी मादीच्या पाठीवर स्वार होतो. या दरम्यान, नर पक्षी त्याचे शुक्राणू स्त्रीच्या शरीरात स्थानांतरित करत असतो.  पक्ष्याचे संभोग हे फक्त 15 सेकंदाचे असते. नर आणि मादी क्लोकाला एकत्र दाबत असतात. दिल्लीचे प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार विनोद गोयल यांनी मोर-लांडोरच्या संभोगाची अनेक छायाचित्रे काढली आहेत.

सर्व संभ्रम दूर करत मोर आणि लांडोर कसे एकमेकांच्या जवळ येतात ते समजून घ्या. लांडोरला पाहून मोर नाचू लागतो. लांडोर त्याला सर्व प्रकारे बघते. मग  आकर्षित झाली तर लांडोर मोरासमोर येते. यानंतर 9 ते 15 संकेदच्या क्लॉकल किस प्रक्रिया सुरू होते.  नागरी सेवेत असलेले विनोद गोयल यांनी सांगितले की,0 की जेव्हा एक जोडपे संभोगात व्यस्त असते, तेव्हा दुसरा मोर काय चालले आहे हे पाहण्यासाठी उत्सुक असतो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी