प्रेमाचा प्रस्ताव दोघांना भोवला, विद्यापीठातून निलंबन

एका तरुणीने बॉयफ्रेंडला जाहीरपणे प्रेमाचा प्रस्ताव दिला आणि तरुणाने स्वखुषीने हा प्रस्ताव स्वीकारला. पण नंतर....

Female Student Proposed To Boyfriend In University Of Lahore Premises Pakistan Watch Viral Video
प्रेमाचा प्रस्ताव दोघांना भोवला, विद्यापीठातून निलंबन 

थोडं पण कामाचं

  • प्रेमाचा प्रस्ताव दोघांना भोवला, विद्यापीठातून निलंबन
  • तरुणीने बॉयफ्रेंडला जाहीरपणे प्रेमाचा प्रस्ताव दिला तरुणाने प्रस्ताव स्वीकारला, व्हिडीओ व्हायरल
  • विद्यापीठाने केली कारवाई; विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे निलंबन

लाहोर: विद्यापीठ म्हटलं की तरुण, तरुणी आले... मग अभ्यासोबतच धमाल करणेही आले... सोबत प्रेमाच्या भानगडीही आल्या... पण एका विद्यापीठाला काही हे मान्य नाही. त्यांना विद्यापीठाच्या आवारात फक्त परंपरागत शिक्षण मान्य आहे. विद्यापीठाच्या या धोरणाचा फटका एका प्रेमी युगुलाला बसला. तरुण आणि तरुणी दोघांना विद्यापीठाने निलंबित केल्याचे पत्र स्वीकारण्याची वेळ आली. (Female Student Proposed To Boyfriend In University Of Lahore Premises Pakistan Watch Viral Video)

तरुणीने बॉयफ्रेंडला जाहीरपणे प्रेमाचा प्रस्ताव दिला तरुणाने प्रस्ताव स्वीकारला, व्हिडीओ व्हायरल

एका तरुणीने बॉयफ्रेंडला जाहीरपणे प्रेमाचा प्रस्ताव दिला आणि तरुणाने स्वखुषीने हा प्रस्ताव स्वीकारला. ही संपूर्ण घटना विद्यापीठाच्या आवारात (युनिव्हर्सिटी कँपस) घडली. विद्यापीठातील उत्साही विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. व्हिडीओ बघणाऱ्या कित्येक जणांनी तो रीट्वीट केला, लाइक केला, शेअर केला. अनेक जणांनी प्रेमी युगुलाला शुभेच्छा दिल्या. व्हिडीओ व्हायरल झाला. 

विद्यापीठाने केली कारवाई; विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे निलंबन

विद्यापीठ प्रशासनाला ही माहिती मिळाली आणि कारवाई झाली. विद्यापीठाच्या आवारात मुलांनी गप्पा मारल्या, चर्चा केली, एकमेकांची चेष्टा केली तर चालेल पण एकमेकांना प्रेमाचा प्रस्ताव देणे किंवा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारणे अशा स्वरुपाची कृती करू नये; अशी भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली. तडकाफडकी विद्यापीठ प्रशासनाने प्रेमाचा प्रस्ताव देणारी तरुणी आणि प्रस्तावाचा स्वीकार करणारा तरुण या दोघांचे निलंबन केले. एका अनोख्या प्रेमकथेला या घटनेमुळे दुःखाची किनार लाभली. सुखद घटनेचा दुःखद शेवट असा हा प्रकार पाकिस्तानमधील लाहोर विद्यापीठात घडला. 

लाहोर विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीची कारवाई, कारवाईचा अनेकांनी केला निषेध

लाहोर विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीने विद्यार्थिनी आणि विद्यार्थी अशा दोघांचेही ताबडतोब निलंबन केले. त्यांच्या हाती निलंबित केल्याचे पत्र दिले. दोन्ही विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आवारातून लगेच बाहेर पडण्यास सांगण्यात आले. ही माहिती थोड्याच वेळात सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण पाकिस्तानमध्ये पसरली. असंख्य सोशल मीडिया युझरनी तसेच लाहोर विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रेमी युगुलाच्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध केला. निलंबनाची कारवाई रद्द करावी आणि दोघांना शिकू द्यावे, अशी मागणी अनेकांनी केली.

लाहोर विद्यापीठाने विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे निलंबन मागे घ्यावे, अनेकांची मागणी

काहींनी तर विद्यापीठाच्या कारवाईची तुलना तालिबानशी केली. 'विद्यार्थी त्यांच्या वयाला साजेसे वागले आहेत. त्यांनी कोणतीही आक्षेपार्ह कृती केलेली नाही. प्रेम व्यक्त करणे किंवा प्रेमाच्या प्रस्तावाचा स्वीकार करणे हा गुन्हा नाही. जी कृती झाली ती विद्यापीठाच्या आवारात झाली. वर्गात नाही. विद्यापीठाच्या आवारात शिस्तभंग म्हणण्यासारखी कोणतीही गंभीर चूक झालेली नाही'; असे मत अनेकांनी व्यक्त केले. विद्यापीठाने निलंबन रद्द करावे यासाठी अनेकांनी प्रशासनावर मतप्रदर्शनातून दबाव टाकायला सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी