Viral: शाळकरी मुलींमध्ये 'गँगवॉर', जोरदार चालेल्या लाथा बुक्के आणि लाठ्या-काठ्या , व्हिडिओ पाहून डोकं फिरेल 

Fight Viral Video: बंगळुरूमधून एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मुली आपापसात मारामारी करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे.

fight between school girls shocking video goes viral read in marathi
Viral: शाळकरी मुलींमध्ये 'गँगवॉर' 
थोडं पण कामाचं
  • शाळकरी मुलींमध्ये जोरदार भांडण
  • मुलींनी एकमेकांचे केस ओढून लाठ्यांचा वर्षाव केला
  • व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला 

Fight Video: सोशल मीडियावर (Social Media) एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना धक्का बसला आहे.  या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलींमध्ये टोळीयुद्ध सुरू आहे. सर्व मुली शालेय गणवेशात आहेत आणि एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याला पहिल्यांचा पाहून धक्काच बसला. त्याचबरोबर काही लोक या व्हिडिओ पाहून मस्करीही  करत आहेत. चला तर मग जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण? (fight between school girls shocking video goes viral read in marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ बंगळुरूचा आहे. मात्र, ही घटना केव्हा घडली आणि हाणामारी का झाली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पण, हा एका नामांकित शाळेचा व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व मुली शाळेच्या ड्रेसमध्ये पाहू शकता. मुली आपापसात भांडत आहेत. कोणी कोणाचे केस ओढत आहेत, तर कोणी जोरदार लाथ मारत आहेत. त्याचबरोबर काहीजण लाठीचा वर्षावही करत आहेत. एवढेच नाही तर या लढ्यात पालकांचाही सहभाग होता. या भांडणात मुलींचेही मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओ पहा...

धक्कादायक व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, हा संघर्ष बराच काळ चालला. काही काळ ते शाळा नसून रणांगण असल्याचा भास झाला. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्विटरवर '@Taha_shah0' नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 78 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोक हैराण झाले आहेत, 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी