Viral Video : टोल भरण्यावरून दोन महिलांची हाणामारी

Fight Between Two Women At Pimpalgaon Baswant Toll Plaza After Dispute Over Toll Payment Video Viral : महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये हाणामारी झाली.

Fight Between Two Women At Pimpalgaon Baswant Toll Plaza
Viral Video : टोल भरण्यावरून दोन महिलांची हाणामारी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • टोल भरण्यावरून दोन महिलांची हाणामारी
  • महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर घडली घटना
  • व्हिडीओ व्हायरल

Fight Between Two Women At Pimpalgaon Baswant Toll Plaza After Dispute Over Toll Payment Video Viral : महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर टोल भरण्यावरून दोन महिलांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. टोलनाक्यावर टोल भरणे, सुटे पैसे या मुद्यांवरून अधूनमधून वाद होतात. पण हाणामारीचे प्रसंग कमी घडतात. याच कारणामुळे दोन महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि सीआरपीएफ जवानाची पत्नी यांच्यात टोल भरण्यावरून हाणामारी झाली. पिंपळगाव पोलिसांनी मध्यस्थी केली. नंतर वादावर पडदा पडला. 

काय घडली घटना?

निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान पत्नी आणि दोन मुलांसोबत पुणे येथे जात होता. कार पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर आली. सरकारी कार्ड दाखवून जवानाने खासगी कार सोडण्याची विनंती केली. टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी टोल भरावा लागेल, कार्ड चालणार नाही, असे सांगितले. वेळेत पोहचता यावे म्हणून वाद न घालता सीआरपीएफ जवानाने टोल भरला. कार पुढे निघणार तोच सीआरपीएफ जवानाची पत्नी टोल नाक्यावरील महिला टोल कर्मचारी यांच्यात वाद सुरू झाला. थोड्याच वेळात वाद वाढला आणि दोघींमध्ये हाणामारी झाली. अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून मध्यस्थी केली. वादावर पडदा पडला. 

वेदांताचा सेमी कंडक्टरशी संबंधित संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात येणार

याआधी जेव्हा टोलनाक्यावर हाणामारी झाली त्यावेळी काही जणांनी पटकन आपल्या मोबाईलमध्ये घटनेचा व्हिडीओ केला. यापैकी एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. 

Shridi Sai baba : शिर्डी साईबाबांच्या चरणी भक्तांकडून तीन सोन्याचे कमळ फुले अर्पण; तब्बल 9 लाख 98 हजार रुपयाचे फुले

काही दिवसांपूर्वी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याशी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वाद घातला होता. या प्रकरणात पोलिसांनी टोल कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवून एका कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी