नितीन गडकरींचा ताफा निघताच पोलिसांमध्ये हाणामारी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाहनांचा ताफा हिमाचल प्रदेशच्या भुंतर विमानतळावरुन निघताच पोलिसांमध्ये हाणामारी झाली.

Fighting between SP Kullu Gaurav Singh and CM Jairam Thakur's security In charge at Bhuntar Airport Himachal Pradesh
नितीन गडकरींचा ताफा निघताच पोलिसांमध्ये हाणामारी 

थोडं पण कामाचं

  • नितीन गडकरींचा ताफा निघताच पोलिसांमध्ये हाणामारी
  • हिमाचल प्रदेशच्या भुंतर विमानतळाच्या परिसरातील घटना
  • उच्चस्तरिय पोलीस चौकशीचे आदेश

नवी दिल्ली: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाहनांचा ताफा हिमाचल प्रदेशच्या भुंतर विमानतळावरुन निघताच पोलिसांमध्ये हाणामारी झाली. गडकरींच्या गाड्यांचा ताफा रवाना होत असतानाच ही घटना घडली. या प्रकरणाच्या उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कारवाई होईल. Fighting between SP Kullu Gaurav Singh and CM Jairam Thakur's security In charge at Bhuntar Airport Himachal Pradesh

विमानतळावर गडकरी आणि मुख्यमंत्री यांची औपचारिक भेट झाली. नंतर गडकरी पाच दिवसांच्या नियोजीत दौऱ्यानुसार पुढे रवाना झाले. पाठोपाठ मुख्यमंत्र्यांचा ताफा निघणार होता. पण त्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका एएसपीची कुलूच्या एसपीसोबत हाणामारी झाली. कुलूच्या एसपीने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एएसपीच्या थोबाडीत मारली. यानंतर कुलूच्या एसपीसह त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एएसपीने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जोरदार उत्तर दिले. पोलिसांची ही हाणामारी पाहून घटनास्थळी उपस्थित इतर मंडळींनी हस्तक्षेप केला. हा हस्तक्षेप अयशस्वी ठरला. आणखी थोडा वेळ हाणामारी झाली. अखेर उपस्थितांनी हाणामारी करणाऱ्यांना ताकदीने एकमेकांपासून दूर नेले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत गडकरी आणि त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री घटनास्थळावरुन निघून गेले होते.

पोलिसांमधील हाणामारीच्या उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणार आहे. विमानतळ परिसरात पोलिसांमध्ये हाणामारी झाल्यामुळे मुख्यमंत्री तसेच पोलीस दलाचे उच्चाधिकारी प्रचंड नाराज असल्याचे वृत्त आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी