Animal Hidden In Picture : नवी दिल्ली : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion)तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दाखवतात. यातील रंजकतेमुळे ते सर्वत्र व्हायरल (Viral) होत आहेत. या ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये एकाचवेळी विविध गोष्टी, प्राणी दडलेल्या असतात आणि ते शोधण्याचे आव्हान असते. या जगात अनेक हुशार लोक आहेत. काही लोक स्वतःला तीक्ष्ण मनाचे समजतात. तमाम कुशाग्र बुद्धीच्या लोकांसाठी आज आम्ही एक अशी छायाचित्रे घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्हाला तुमच्या नजरेवर आणि बुद्धिमत्तेवर शंका येऊ लागेल. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यात एक गोंडस प्राणी लपलेला आहे. जर तुम्ही या चित्रात लपलेल्या प्राण्याबद्दल सांगितले तर तुम्ही या जगातील सर्वात प्रतिभावान व्यक्ती म्हणून ओळखले जाल. (Find out a animal in this optical illusion, do you see it)
पांढऱ्या-काळ्या पट्ट्यांचे हे चित्र पाहून भल्याभल्या लोकांच्या डोक्याचा भूगा झाला आहे. अनेक लोक हे चित्र रात्रंदिवस पाहत आहेत, त्यानंतरही ते चित्रात लपलेला प्राणी शोधण्यात त्यांना यश येत नाही. अनेक जण स्वतः अपयशी झाल्यावर त्यांच्या मित्रांना चित्रे पाठवून त्यांच्या मनाची परीक्षा घेत असतात. मात्र, त्याचे मित्रही चित्रात लपलेल्या प्राण्याचा शोध घेण्यासाठी अहोरात्र एक करत आहेत, मात्र हा प्राणी त्यांना दिसत नाही.
आम्ही तुम्हाला सांगतो की हे ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच 'डोळ्यांना फसवणारे' चित्र आहे. अशा चित्रांमध्ये काहीतरी आहे, पण ते सहजासहजी दिसत नाही. यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि एकाग्रतेने चित्राकडे लक्ष द्यावे लागते. हे चित्रही असेच आहे, जे पाहून लोकांचे मन भरकटले आहे. या कृष्णधवल रेषेच्या चित्रात प्राणी कुठे बनवला आहे हे लोकांना समजत नाही. कदाचित तुम्हालाही प्रथमदर्शनी वाटेल की आम्ही तुम्हाला फसवत आहोत. तुम्हाला हे चित्र मूर्खपणाचे वाटेल, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की हे चित्र पूर्णपणे मूळ आहे आणि त्यात खरोखर एक प्राणी आहे.
जर तुम्ही अजून चित्रातला प्राणी पाहिला नसेल, तर तुम्हाला काहीतरी वेगळे करून पाहावे लागेल, कारण चित्रातील प्राणी शोधणे सोपे नाही. तुम्हाला अजूनही चित्रात लपलेला प्राणी सापडला नाही, तर तुमचा फोन तुमच्या चेहऱ्यापासून दूर ठेवा. काय झाले तुम्हाला प्राणी दिसला? तरीही दाखवत नसल्यास दुसरी पद्धत आहे, जी तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही फोटो झूम आउट करा. फोटो छोटा होताच, चित्रात लपलेली मांजर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल.
ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित शेकडो चित्रे सोशल मीडियावर बऱ्याच काळापासून पाहिली जात आहेत. ही चित्रे समोर आल्यावर, लोकांना त्यांच्यामध्ये लपलेली वस्तू शोधण्यास सांगितले जाते. हे एकप्रकारचे दृष्यात्मक भ्रम असतात. यातून तुम्हाला नेमके जे हवे ते शोधायचे असते. एकप्रकारे हे एक बौद्धिक आव्हानदेखील असते. याबाबत सोशल मीडिया (Social Media) यूजर्स एकमेकांना आव्हानही देत आहेत.