Optical illusion: या ऑप्टिकल इल्युजनमध्ये साप सापडतोय का? 10 सेकंदात शोधण्याचे आव्हान!

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन सध्या प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. या चित्रांमधील कोडी आणि आव्हान यामुळे ते युजर्समध्ये व्हायरल (Viral) होत आहेत. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion)हे एकप्रकारचे भ्रम असतात. या चित्रात एक साप तुम्हाला चटकन शोधायचा आहे.

Optical illusion
ऑप्टिकल इल्युजन 
थोडं पण कामाचं
  • इंटरनेटवर ऑप्टिकल इल्युजन लोकप्रिय
  • ऑप्टिकल इल्युजनमध्ये मनोरंजन आणि कसोटी दोन्ही असतात
  • या चित्रात साप शोधण्याचे आव्हान

Optical Illusion: नवी दिल्ली : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन सध्या प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. या चित्रांमधील कोडी आणि आव्हान यामुळे ते युजर्समध्ये व्हायरल (Viral) होत आहेत.  इंटरनेटवर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन दिसतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion)हे एकप्रकारचे भ्रम असतात. आपले डोळे आणि मेंदू यांना भ्रमात टाकण्यासाठी हे एकप्रकारचे कोडे असते. मात्र यामुळे यात रस निर्माण होतो. सोशल मीडियावर अनेक वेळा अशी चित्रे दिसतात ज्यात ऑप्टिकल इल्युजन असतात. म्हणजे असे काही चित्र ज्यामध्ये काही गोष्टी अगदी जवळून दडलेल्या असतात पण अनेकदा त्या आपल्या डोळ्यांना फसवून निघून जातात. अलीकडच्या काही दिवसांत अशी अनेक छायाचित्रे समोर आली आहेत, ज्याबद्दल यूजर्स डोकं खाजवत राहतात. चित्राचे कोडे असो किंवा पेंटिंगमध्ये लपलेले काहीतरी असो, ऑप्टिकल भ्रम सोडवणे नेहमीच मजेदार असते. ऑप्टिकल इल्युजन  हा तुमच्याशी एकाग्रता आणि दृष्टी यांचा असा खेळ खेळतो की पाहणाऱ्याला गोंधळात टाकतो. कारण या चित्रांमध्ये जे दिसतंय ते तिथे तसंच नसतं. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असेच एक चित्र आहे ज्यात तुम्हाला साप शोधायचे आहे. (Find out snake in this viral optical illusion)

अधिक वाचा : Landslide At Jammu: जलविद्युत प्रकल्पात भूस्खलन; चार मजूर ठार, 6 जखमी

Optical Illusions चे उद्दिष्ट तुमच्या समोर उभ्या असलेल्या चित्राद्वारे तुमची चाचणी घेणे आणि तुमच्या कौशल्यांची चाचणी घेणे आहे. या व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये  झाडावर अनेक पोपट बसलेले आहेत आणि त्यात एक साप आहे. हा साप चटकन शोधून काढणे हे तुमच्यासमोरील आव्हान आहे.  

अधिक वाचा - Haldi Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या हळदीचे पाणी, आठवड्याभरात पहा फरक

चित्रातील साप शोधणे फार कठीण मानले जाते. ठरलेल्या वेळेत साप शोधण्यात केवळ एक टक्का लोकांनाच यश आल्याचे मानले जात आहे. यावरून ऑप्टिकल भ्रम किती कठीण असतात याची कल्पना येते. या चित्रात पोपट झाडाच्या फांद्यावर बसलेले दाखवले आहेत. या चित्रात कुठेतरी साप लपलेला आहे पण तो ओळखणे सोपे नाही.

या चित्रात साप शोधण्यासाठी 10 सेकंद देण्यात आले आहेत. अनेक युजर्सना वरकरणी हे आव्हान सोपे वाटते मात्र त्यांना चित्रात लपलेला साप सापडत नाही. चित्रातील साप कुठे आहे ते याची युक्ती आम्ही तुम्हाला सांगतो. या चित्राच्या मध्यभागी डावीकडे जवळून पहा, तुम्हाला झाडाच्या पानांमध्ये एक हिरवा साप दिसेल. 

अधिक वाचा : Gujarat Election 2022 : या आठवड्यात गुजरात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोग करणार घोषणा

या ऑप्टिकल इल्युजनची गंमत म्हणजे या चित्रातील साप शोधण्यासाठी खूप डोके चालवावे लागते. वरकरणी सोपे वाटणारे हे कोडे तितके सोपे नाही. पाहा तुमची निरीक्षण शक्ती किती आहे. खूप नीटपणे पाहिल्यावर तुम्हाला हा साप सापडेल. हा चेहरा सापडला तर तुम्ही नक्कीच तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे आहात आणि तुमची निरीक्षण शक्ती जबरदस्त आहे. सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजनची धूम आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी