Viral Video : कुत्र्याने घेतला चिमुकल्याचा चावा, मालकीण फक्त राहिली बघत, व्हिडीओ व्हायरल

लिफ्टमध्ये कुत्र्याने एका चिमुकल्याचा चावा घेतला, चावा घेतल्यानंतर मुलाला दुखत होते, परंतु कुत्र्याच्या मालकीणीला त्याचे काहीच वाटले नाही. ती फक्त त्या मुलाकडे बघत होती. गाझियाबादमधली ही घटना असून या प्रकरणी कुत्र्याच्या मालकीणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडं पण कामाचं
  • लिफ्टमध्ये कुत्र्याने एका चिमुकल्याचा चावा घेतला, चावा घेतल्यानंतर मुलाला दुखत होते,
  • परंतु कुत्र्याच्या मालकीणीला त्याचे काहीच वाटले नाही.
  • गाझियाबादमधली ही घटना असून या प्रकरणी कुत्र्याच्या मालकीणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Viral Video :  गाझियाबाद : लिफ्टमध्ये कुत्र्याने एका चिमुकल्याचा चावा घेतला, चावा घेतल्यानंतर मुलाला दुखत होते, परंतु कुत्र्याच्या मालकीणीला त्याचे काहीच वाटले नाही. ती फक्त त्या मुलाकडे बघत होती. गाझियामधली ही घटना असून या प्रकरणी कुत्र्याच्या मालकीणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fir lodged against pet parent in gaziabad dog bite kid cctv video viral)

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये नंदग्राम भागातील राजनगर एक्सटेंशन चार्म्स सोसायटीच्या लिफ्टमध्ये एक महिला आपल्या कुत्र्यासोबत जात होती, तेव्हा एक लहान मुलगा ट्युशनवरून घरी जात होता. मुलगा जेव्हा लिफ्टमधून बाहेर पडत होता तेव्हा कुत्र्याने त्याला जोरदार चावा घेतला. कुत्रा चावल्यानंतर मुलाला खुप दुखत होते ते जिथे जखम चोळत होता. इतकेच काय त्याला कुत्रा चावल्यामुळे धड उभेही राहता येत नव्हते. एवढंच काय होत असताना त्या बाईला या मुलाची बिल्कूल दया आली नाही, तिने त्या मुलाला विचारलेही नाही किंवा डॉक्टरकडे नेले नाही. त्यानंतर मुलगा आपल्या घरी गेला आणि आईला याबद्द्ल सांगितले. आईने मुलाला आधी डॉक्टरकडे नेले आणि उपचार करून घेतले. 

त्यानंतर मुलाच्या वडिलांनी या बाईचा शोध घेतला. तेव्हा तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान लिफ्टमधील ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेटकर्‍यांनीही या महिलेवर टीका करत मुलावर दया न दाखवल्याने रोष व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी