Fire in Wedding : नवरदेवासाठी लग्नाचा दिवस ठरला असता शेवटचा; वरातीमध्ये वराच्या रथाला लागली आग

Fire in Wedding : देशात सध्या लग्नांची (Wedding ) धामधूम चालू आहे. मोठं-मोठी शाही लग्न कार्यक्रम पार पडत आहेत. लग्नाचा दिवस हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असतो. याच आनंदाच्या दिवशी मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे

Fire in Wedding :
वरातीमध्ये वराच्या रथाला लागली आग   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • वराती दरम्यान नवरदेवाच्या रथाला लागली आग.
  • सुदैवाने नवरदेव वाचला.
  • फटाक्यांमुळे नवरदेवाच्या रथाला लागली आग

Fire in Wedding : नवी दिल्ली : देशात सध्या लग्नांची (Wedding ) धामधूम चालू आहे. मोठं-मोठी शाही लग्न कार्यक्रम पार पडत आहेत. लग्नाचा दिवस हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस असतो. याच आनंदाच्या दिवशी सुदैवाने मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे. या अनर्थाची बातमी सोशल मीडियातून (social media) मिळाली आहे. हा भयानक व्हिडिओ (video) गुजरातमधील (Gujarat Wedding Fire) एका लग्न वरातीचा आहे. नवरदेवाची वरात जात असताना नवरदेवाच्या रथामध्ये फटाक्यामुळे आग लागली सुदैवाने नवरदेव थोडक्यात बचावला, परंतु तेथील उपस्थित एक व्यक्ती आगीमुळे होरपळला गेला आहे. वरातीच्या रथात आग लागताच तेथे धावपळ सुरू झाली. 

व्हायरल होत आहे भयानक व्हिडिओ 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरातमधील पंचमहाल शहरातील जोगेश्वरी महादेव मंदिरातील रहिवासी शैलेश भाई शाह यांचा मुलगा तेजस याचे लग्न शहरातील दुसऱ्या भागातील मुलीसोबत होत होते. यासाठी शैलेश थाटामाटात घरातून बाहेर पडला आणि वरात निघाली. मात्र, तेजसच्या वरातीच्या रथाला आग लागल्याने आनंदाचे वातावरणामध्ये विरंजन पडलं.  वरात चालू असतानाच अचानकपणे रथात आग लागली. यामुळे वरातीमधील वऱ्हाडी मंडळी पळापळ करू लागले. रथावरील आग भडका घेण्याआधीच लोकांनी नवरदेवाला खाली उतरवून घेतलं. 

संपूर्ण वॅगन  (वरातीचा रथ)जळून राख 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाहता-पाहता संपूर्ण वरातीच्या रथ (वॅगन) जळून खाक झाल्याचे दिसत आहे. वरातीच्या रथाला आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणणे कठीण झाले होते. हा व्हिडिओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं की, ' वरातीदरम्यान रथाला आग लागली, नवरदेव थोडक्यात बचावला पण एक जण गंभीररित्या भाजला गेला, 

वरातीत फटाके फोडणं ठरलं घातक 

वरात निघाली असताना आपला आनंद व्यक्त करण्यासाठी वऱ्हाडी मंडळी फटाके फोडत होती. परंतु एक जळता फटाका रथातील जनरेटवर पडला, आणि विस्फोट होत संपूर्ण रथाला भीषण आग लागली. 

विस्फोट झाल्या त्यावेळी रथात बसला होता नवरदेव 

या दुर्घटनेनंतर आग कशीतरी आटोक्यात आणण्यात आली. त्याचबरोबर (वॅगन) रथ ओढणाऱ्या घोडयांचे प्राणही कसेबसे वाचविण्यात आले आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, वराच्या स्वागतासाठी वॅगनमध्येच फटाके ठेवण्यात आले होते. बातम्यांनुसार, वऱ्हाडी  बँण्डच्या तालावर नाचत होते, आणि वरातीमध्ये फटाकेही फोडले जात होते. त्याच दरम्यान एक फटाका रथामध्ये असलेल्या फटाक्यांमध्ये पडला आणि विस्फोट झाला. रथात एक जनरेटरही होते. रथात विस्फोट झाला तेव्हा नवरदेवासोबत काही लहान मुले बसले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी