VIRAL VIDEO: धावत्या कारच्या छतावर फटाके फोडले अन् पोलिसांनी पकडताच कान पकडून उठाबशा काढू लागले

Viral Video: दिवाळीचा उत्सव सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत असतानाच दुसरीकडे काही तरुणांनी चक्क कारच्या छतावर फटाके फोडल्याचा व्हिडिओ समोर आला. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणांना पकडून त्यांना अशी काही शिक्षा दिली की या तरुणांना चांगलीच अद्दल घडली असेल.

firecrackers bust on top of car later police punished them video goes viral watch it
VIRAL VIDEO: धावत्या कारच्या छतावर फटाके फोडले अन् पोलिसांनी पकडताच कान पकडून उठाबशा काढू लागले  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • दिवाळीच्या रात्री तरुणांनी धावत्या कारच्या छतावर फोडले फटाके
  • व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई
  • पोलिसांनी तरुणांना पकडून रस्त्यावरच दिली शिक्षा

Firecrackers bust on roof top of moving car: सोशल मीडियात काहीतरी फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करुन प्रसिद्धी मिळवण्याचा काहीजण प्रयत्न करतात. मात्र, हे करत असताना ते असं काही करतात की ज्यामुळे काहीतरी विचित्रच घडते. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. काही तरुणांनी मिळून चक्क धावत्या गाडीच्या छतावर फटाके फोडले. या घटनेचा त्यांनी व्हिडिओ शूट केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना पकडून चांगलीच अद्दल घडवली आहे. (firecrackers bust on top of car later police punished them video goes viral watch it)

नेमकं काय घडलं? 

ही घटना गुजरातमधील अहमदाबाद येथील आहे. येथील काही टवाळखोरांनी आपल्या कारच्या छतावर फटाके लावले आणि मग धावत्या कारवर हे फटाके फोडले. अहमदाबाद पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, दिवाळीच्या रात्री काही तरुण धावत्या गाडीवर फटाके फोडत आहेत. त्यानंतर पोलिसांनी या तरुणांना जी शिक्षा दिली त्याचा व्हिडिओ सुद्धा पुढे आहे.

पोलिसांनी या सर्व तरुणांना पकडले आणि त्यानंतर रस्त्यावर त्यांना उठाबशा काढण्यास सांगितले. हा घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत.

हे पण वाचा : तुमची रास सांगते तुम्ही किती खोटारडे आहात​

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, काही तरुण कारच्या बोनेटवर बसले आहेत. तर काही तरुण कारच्या खिडकीतून बाहेर डोकावत आहेत आणि त्या कारच्या छतावर फटाके फोडण्यात येत आहेत. इतकेच नाही तर या तरुणांच्या कारच्या मागे आणि पुढे सुद्धा इतर गाड्यांवर काही तरुण आरडा-ओरड करताना दिसून येत आहेत.

अहमदाबाद येथील सिंधूभवन मार्गावर काही तरुण धावत्या कारवर फटाके फोडत होते. या दरम्यान पोलिसांनी या तरुणांना थांबवले सुद्धा होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. त्यानंतर आरोपींना पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांना रस्त्यावर उठाबशा काढण्याची शिक्षाही दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी