Snake in Lunch : विमानात जेवताना सावधान! जेवणात सापडलं सापाचं तुटलेलं डोकं, पाहा VIDEO

विमानात केबिन क्रूची मेंबर जेवण करत असताना अचानक तिला तिच्या प्लेटमध्ये एक मेलेल्या सापाचा तुकडा दिसला.

Snake in Lunch
जेवणात सापडलं सापाचं तुटलेलं डोकं 
थोडं पण कामाचं
  • केबिन क्रूच्या जेवणात सापडलं सापाचं मुंडकं
  • जेवणाच्या शेवटी प्लेटमध्ये होता तुकडा
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Snake in Lunch : विमान प्रवासादरम्यान (Airplane travel) एका फ्लाईट अटेंडंटच्या (Flight Attendant) जेवणात (Meal) सापाचं कापलेलं मुंडकं (Head of dead snake) आढळलं. टर्कीच्या (Turkey) एका विमानात ही घटना घडली. जेवणाच्या थाळीत असलेलं सापाचं मुंडकं पाहून अटेंडंटच्या पायाखालची जमीनच सरकली. 21 जुलै रोजी अंकाराहून जर्मनीकडे चाललेल्या विमानात हा प्रकार घडला. कॅबिन स्टाफमधील काहीजण जेवायला बसले असताना त्यांच्या जेवणात अचानक सापाचं मुंडकं पडल्याचं दिसून आलं. एका मुक्त पत्रकाराने याबाबत माहिती दिल्यानंतर जगभरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. 

विमान कंपनीकडून कारवाई

या घटनेनंतर विमान कंपनीने त्यांच्या फूड सप्लायरसोबतचा करार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. केबिन क्रूला जे जेवण पुरवण्यात आलं होतं, त्यापैकी एकाच्या थाळीत सापाचं डोकं आढळून आलं. या थाळीत बटाटे आणि इतर काही भाज्या होत्या. जेवण संपत आल्यावर अचानक प्लेटमध्ये असणारं सापाचं मुंडकं दिसून आलं आणि ते पाहून सर्वांनाच मळमळायला लागलं. या थाळीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. 

विमान कंपनीचं स्पष्टीकरण

आम्ही ज्या कंपनीला विमानात जेवण पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं, त्या कंपनीची ही चूक असल्याचा दावा टर्कीच्या विमान कंपनीनं केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर त्या कंपनीवर कारवाई करण्यात आली असून इथून पुढे कधीही असा प्रकार विमानात मिळणाऱ्या जेवणाबाबत होणार नाही, याची ग्वाही कंपनीनं दिली आहे. आम्ही नेहमीच आमच्या प्रवाशांना उच्च दर्जाचं जेवण आणि आरामाच्या सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि पुढेही हाच दर्जा कायम राखला जाईल, असं आश्वासन कंपनीनं दिलं आहे. 

अधिक वाचा - तेरे इश्क में नाचेंगे: जेव्हा DJ च्या तालावर घोड्यानेच धरला ठेका ! पहा VIDEO

केटरिंग कंपनीचा खुलासा

जेवणाच्या अगदी शेवटी हा सापाचा तुकडा आढळून आला होता. मात्र जेवण पुरवणाऱ्या कंपनीने मात्र ही आपली जबाबदारी नसल्याचं म्हटलं आहे. ट्विटरवर अपलोड केलेल्या व्हिडिओत जेवण संपत आल्यावर फ्लाईट अटेंडंटला सापाचा तुकडा मिळाल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भविष्यात कधीही टर्की एअरलाईन्सने प्रवास करणार नसल्याचं एकानं म्हटलं आहे, तर ही अनवधानाने काही चूक झालेली असू शकते, असा समजुतीचा सूर काहीजणांनी आळवला आहे. 

अधिक वाचा - Viral Story : जिद्दीची कहाणी! 39 वेळा नाकारले.. 40व्या वेळी झाली निवड, अखेर गुगलमध्ये नोकरीचे स्वप्न पूर्ण...

विमानातील खाण्यापिण्याचे वाईट अनुभव

विमानात मिळणाऱ्या शिळ्या जेवणापासून ते आता प्लेटमध्ये सापाचा तुकडा सापडेपर्यंत अनेक वाईट अनुभव आतापर्यंत प्रवाशांना आले आहेत. नुकताच एका हवाई सुंदरीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. विमानात जे पाणी चहा-कॉफीसाठी वापरलं जातं, त्याची टाकी कित्येक महिने स्वच्छ केली जात नसल्याचं तिनं म्हटलं होतं. त्यानंतर आता हा प्रकार आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी