अर्ध्या तासात एक समोसा खा आणि ५१ हजार रुपये जिंका

Food Challenge eat a samosa in half an hour and take home 51000 rupees know why people ca not eat, Samosa Eating Challenge : सोशल मीडियावर सध्या समोसा चॅलेंजची चर्चा आहे. यात अर्ध्या तासात एक समोसा व्यवस्थित खाऊन दाखवणाऱ्यास ५१ हजार रुपये जिंकता येतील.

Food Challenge eat a samosa in half an hour and take home 51000 rupees know why people ca not eat, Samosa Eating Challenge
अर्ध्या तासात एक समोसा खा आणि ५१ हजार रुपये जिंका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अर्ध्या तासात एक समोसा खा आणि ५१ हजार रुपये जिंका
  • एक बाहुबली समोसा तयार करण्याचा खर्च ११०० रुपये
  • आठ किलो वजनाचा बाहुबली समोसा

Food Challenge eat a samosa in half an hour and take home 51000 rupees know why people ca not eat, Samosa Eating Challenge : सोशल मीडियावर सध्या समोसा चॅलेंजची चर्चा आहे. यात अर्ध्या तासात एक समोसा व्यवस्थित खाऊन दाखवणाऱ्यास ५१ हजार रुपये जिंकता येतील. समोसा चॅलेंज उत्तर प्रदेशमधील मेरठच्या लाल कुर्ती बाजारातील कौशल स्वीट्स दुकान चालविणाऱ्या शुभम नावाच्या दुकानदाराने दिले आहे. चॅलेंजसाठी त्याने बाहुबली समोसा नावाचा आठ किलो वजनाचा खास समोसा तयार केला आहे.

एक बाहुबली समोसा तयार करण्याचा खर्च ११०० रुपये एवढा आहे. या आठ किलो वजनाच्या बाहुबली समोसामध्ये बटाटा, मसाला, सुकामेवा, मटार, पनीर मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी ८० जणांनी एकत्र येऊन एक बाहुबली समोसा खाऊन संपवला होता. पण कोणीही बाहुबली समोसा एकट्याने अर्ध्या तासात खाऊन संपवण्याचे चॅलेंज स्वीकारले नाही. याआधी दुकानदार शुभम याने एक चार किलो वजनाचा समोसा तयार केला होता.

शुभम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ४ किलो वजनाचा समोसा तयार करून तो खाणाऱ्याला ११ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. आता शुभम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ८ किलो वजनाचा समोसा तयार केला आहे. एक आठ किलो वजनाचा बाहुबली समोसा एकट्याने अर्ध्या तासात व्यवस्थित खाऊन संपवला तर त्याला ५१ हजार रुपये देण्याची घोषणा शुभमने केली आहे. हे समोसा चॅलेंज अद्याप कोणीही पूर्ण केलेले नाही. पण शुभमने आणखी एक पाऊल पुढे जात दहा किलो वजनाचा समोसा तयार करण्याची इच्छा असल्याचे जाहीर केले आहे. 

टप्प्याटप्प्याने पुढे सरकत महाकाय समोसा तयार करून शुभम विश्वविक्रम स्थापन करण्याचा विचार करत आहे. पण त्याचे ८ वजनाचा समोसा खाण्याचे समोसा चॅलेंज अद्याप कुणीही पूर्ण केलेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी