Raksha Bandhan 2022: हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण दरवर्षी श्रावण (Shravan) महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. भाऊ-बहिणीच्या (Brother-Sister) या सणाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. भारतात (India) लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. पण, या देशात असे एक गाव आहे जिथे शतकानुशतके हा सण साजरा केला जात नाही. (for centuries festival of raksha bandhan is not celebrated in surana village of muradnagar know the reason)
या गावात रक्षाबंधनाला एकाही पुरुषाच्या मनगटावर राखी नसते. उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून ३० किमी अंतरावर असलेल्या मुरादनगरच्या सुराणा गावात १२व्या शतकापासून लोक रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत. या गावातील सुना आपल्या भावांना राखी बांधतात, मात्र या गावातील मुली रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत. एवढेच नाही तर या गावातील लोक इतरत्र स्थायिक झाले असेल तरी ते देखील रक्षाबंधनाचा सणही साजरा करत नाहीत. गावातील लोकही हा दिवस काळा दिवस मानतात. सुराणा गाव पूर्वी सोनगड म्हणून ओळखले जात असे. सुराणा हे छाब्रिया गोत्रातील चंद्रवंशी अहीर क्षत्रियांचे मोठं ठाणं होतं.
छाब्रिया गोत्रातील अहिरांनी राजस्थानातील अलवरमधून बाहेर पडल्यानंतर सुराणा येथे एक छोटं गाव वसवलं होतं. असे मानले जाते की, जेव्हा अहिरांनी या गावात लोकवस्ती केली तेव्हा त्यांची संख्या शंभर होती आणि राणा म्हणजे योद्धा, म्हणून त्या शंभर क्षत्रिय अहिर राणांच्या नावावरून या अहिरांचे नाव सुराणा पडले. गावाची एकूण लोकसंख्या सुमारे 22 हजार आहे. ज्यामधील बहुतेक नागरिक रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत. कारण, हा दिवस ते अशुभ मानतात.
दरम्यान, या गावामध्ये जे नंतर वास्तव्यास आले ती लोकं देखील गावाची ही परंपरा आजपर्यंत पाळत आले आहेत. याशिवाय जे गाव सोडून इतरत्र राहायला गेले आहेत, तेही रक्षाबंधन साजरा करत नाहीत.
कोणीही साजरा करत नाही रक्षाबंधनाचा सण
गावातील लोकांचे म्हणणे आहे की, छाब्रिया गौत्रातील कोणीही व्यक्ती रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाही. शेकडो वर्षांपूर्वी राजस्थानातून आलेल्या पृथ्वीराज चौहान यांचे वंशज सोनसिंग राणा यांनी हिंडन नदीच्या काठावर तळ ठोकला होता. पृथ्वीराज चौहानचे वंशज सोहनगड येथे राहतात हे जेव्हा मोहम्मद घोरीला कळले तेव्हा त्याने रक्षाबंधनाच्या दिवशी सोहनगडावर हल्ला करून स्त्रिया, लहान मुले, वृद्ध आणि तरुणांना हत्तींच्या पायाखाली चिरडले होते.
असं सांगितलं जातं की, मोहम्मद घोरीने या गावावर अनेकदा हल्ला केला होता. पण प्रत्येक वेळी गावात शिरताना त्याचे सैन्य आंधळे होत होते. कारण देवता या गावाचे रक्षण करत असत. दरम्यान, रक्षाबंधनाच्या दिवशी देवता गंगेत स्नानासाठी गेले होते. याची माहिती मोहम्मद घोरीला मिळाली आणि त्याचा फायदा घेत मोहम्मद घोरीने या गावावर हल्ला केला.
ही आहे नेमकी गोष्ट
काही लोकांचा असं म्हणणं आहे की, 1206 मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी मोहम्मद घोरीने गावावर हत्ती घेऊन हल्ला चढवला होता. आक्रमणानंतर काही वर्षांनी हे गाव पुन्हा वसवलं गेलं. कारण त्या दिवशी गावातील एक मूळ रहिवासी असलेली 'जसकौर' ही महिला तिच्या माहेरी गेली होती. कारण ती त्यावेळी गर्भवती होती. जेव्हा घोरीने हल्ला केला तेव्हा ती गावात नव्हती आणि म्हणूनच ती वाचली होती.
पुढे जसकौर हिने 'लकी' आणि 'चुंडा' या दोन मुलांना जन्म दिला आणि दोन्ही मुले मोठी होऊन सोनगढमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी हे गाव पुन्हा वसवलं.
दरम्यान, गावातील काही लोकांनी रक्षाबंधनाच्या सण साजरा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या घरांमध्ये काही दुर्घटना घडल्या ज्यामुळे पुन्हा कोणीही रक्षाबंधनाचा सण साजरा केला नाही.