'पापा की परी अन् एका स्कूटीवर चारचौघी', मुंबईतील VIDEO VIRAL

Viral Video: सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका स्कूटीवर चार मुली प्रवास करताना दिसत आहेत. या मुलींनी हेल्मेट सुद्धा परिधान केलेले नाहीये.

four Girls riding on scooty at palm beach road Vashi video goes viral in social media watch it
'पापा की परी अन् एका स्कूटीवर चारचौघी', मुंबईतील VIDEO VIRAL  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • एका स्कूटीवर चार मुलींची सवारी
  • हेल्मेट न घालता एका स्कूटीवरुन चौघी करत होत्या प्रवास
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात होयोत व्हायरल

Viral Video: सोशल मीडियात दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतो. यापैकी काही व्हिडिओ खूपच फनी असतात तर काही व्हिडिओ धक्कादायक असे असतात. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसत आहे की, चार मुली एका स्कूटीवर बसून प्रवास करत आहेत. या चार मुलींपैकी एकाही मुलीने डोक्यात हेल्मेट घातलेलं नाहीये आणि वेगाने गाडी चालवताना दिसत आहेत.

चार मुलींपैकी दुसऱ्या क्रमांकावर बसलेली मुलगी स्कूटी चालवत आहे. स्कूटी खूपच वेगाने चालवताना या मुली दिसत आहेत. या स्कूटीच्या शेजारून जाणाऱ्या एका कारमधील व्यक्तीने या मुलींचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ शूट करुन सोशल मीडियात पोस्ट केला. व्हिडिओ पाहून नवी मुंबई पोलिसांनीही तात्काळ कारवाई करण्याचं म्हटलं.

हे पण वाचा : ही ओषधी वनस्पती केसांना लावा अन् जादू पाहा

हा व्हिडिओ रुपाली शर्मा @RupaliVKSharma या ट्विटर हँडलवरुन 26 मार्च रोजी पोस्ट करण्यात आला आहे. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटलं, तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ वाशीतील पाम बीच रोड येथील आहे. चार मुली एका स्कूटीवर हेल्मेट शिवाय प्रवास करताना दिसत आहेत. या दरम्यान त्या सेल्फी आणि व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत.

मजा-मस्ती करणं वेगळी गोष्ट आहे मात्र, गाडीवर अशा प्रकारे चार मुलींनी एका स्कूटीवर बसून सेल्फी क्लिक करणं म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखं आहे. इतकेच नाही तर या चार मुलींपैकी कुणीही हेल्मेट परिधान केलेलं नाहीये. ही घटना 25 मार्च रोजीची असल्याचं बोललं जात आहे.

हे पण वाचा : असंख्य गुण असलेली शतावरी पुरुषांना देते जबरदस्त स्टॅमिना अन् पावर

हा व्हिडिओ आतापर्यंत 12 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच या व्हिडिओ काहींनी लाईक सुद्धा केलं आहे. पण अनेक युजर्सने कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, जरा यांचा वेग तर पाहा. तर दुसऱ्या युजरने लिहिलं, दिलों का स्टूर है मेरा स्कूटर. अनेक युजर्सने हा स्टंट खूपच धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी