Fruit Expensive than Diamond | अबब! हिऱ्यापेक्षाही महाग आहे हे फळ, किंमत ऐकून व्हाल थक्क

Fruit Expensive than Diamond | या फळाची शेती जपानमध्ये होते. हे फळ मुख्यत: जपानमध्येच विकले जाते. या फळाची निर्यात फारशी केली जात नाही. या फळाची लागवड सुर्यप्रकाशात नाही तर ग्रीन हाउसमध्ये केली जाते.

Fruit Expensive than Diamond
हिऱ्यापेक्षा महागडे फळ  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • जपानमध्ये एक असे फळ आहे ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे
  • सर्वात महागड्या फळांपैकी एक असणाऱ्या या फळाचे नाव युबरी खरबूज असे आहे
  • जपानमध्ये मिळणाऱ्या या फळाची किंमत १० लाख रुपये आहे

Fruit Expensive than Diamond | नवी दिल्ली: जगात विविध प्रकारची फळे (Fruits)असतात, त्यांच्या किंमतीदेखील वेगवेगळ्या असतात. सर्वसाधारणपणे फळांच्या किंमती १५० ते  २०० रुपये किलो असतात. जी महागडी फळे असतात त्यांची किंमत ४००-५०० रुपयांपर्यत जाते. भारतात तर विविध प्रकारची डझनावारी फळे आणि भाज्या उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्हाला एखादे लाखो रुपये किंमतीचे फळ (Costliest Fruit) मिळाले तर तुम्ही काय कराल? इतक्या मोठ्या किंमतीला एखादे फळ असू शकते हे खरेच वाटत नाही ना. (Fruit Expensive than Diamond | This Japanese fruit is more expensive than Diamond)

जपानमध्ये एक असे फळ आहे ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. हे फळ विकत घेण्याबद्दल सर्वसामान्य माणूस विचार देखील करू शकत नाही. हे फळ नेमके कोणते आणि त्याची काय वैशिष्ट्ये आहेत ते पाहूया. हे फळ इतके का महाग आहे ते पाहूया.

हिऱ्यापेक्षा महागडे आहे हे फळ

काही लोकांना विविध प्रकारची फळे खायला आवडते. काहींना नवनवीन प्रकारची फळे खायचा छंद असतो. सर्वसाधारणपणे फळांची किंमत १०० रुपयांपासून ते १,००० रुपयांपर्यत असते. मात्र जपानमधील या फळाची किंमत लाखो रुपये आहे. हे ऐकूण कोणालाही असेच वाटेल की हे असे कोणते फळ आहे ज्याची किंमत लाखो रुपये आहे. खरेच एखाद्या फळाची किंमत इतकी असते का. ही किंमत तर सोने किंवा हिऱ्यापेक्षाही जास्त आहे. हे फळ खाण्यापेक्षा हिऱ्यात किंवा सोन्यात गुंतवणूक केलेली योग्य असेच बहुतांश लोकांचे मत असेल. मात्र जपानमध्ये एका लिलावात या फळाला ही किंमत मिळाली आहे.

जपानमध्ये मिळणारे फळ

जगातील सर्वात महागड्या फळांपैकी एक असणाऱ्या या फळाचे नाव युबरी खरबूज असे आहे. या फळाची शेती जपानमध्ये होते. हे फळ मुख्यत: जपानमध्येच विकले जाते. या फळाची निर्यात फारशी केली जात नाही. या फळाची लागवड सुर्यप्रकाशात नाही तर ग्रीन हाउसमध्ये केली जाते. जपानमध्ये मिळणाऱ्या या फळाची किंमत १० लाख रुपये आहे. २० लाख रुपयात दोन युबरी खरबूज मिळतात. २०१९ मध्ये हे फळ ३३ लाख रुपयांना विकले गेले होते. आतून नारिंगी रंगाचे असणारे हे फळ अत्यंत मधूर असते.

मियाझाकी आंबा

असेच एक महागडे फळ भारतातील मध्य प्रदेशात आहेत. हा आहे मियाझाकी आंबा. मध्य प्रदेशातील जबलपूर (Jabalpur) येथील संकल्प परिहार यांनी आंब्याच्या झाडांच्या सुरक्षेसाठी फक्त चार सुरक्षा रक्षकच ठेवलेले नाहीत तर सहा कुत्रेसुद्धा दिवसरात्र या झाडांवर देखरेख करतात. कारण ही झाडे आहेत मियाझाकी (miyazaki)या आंब्याची. हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे. जपानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मियाझाकी आंब्याची किंमत २.७० लाख रुपये आहे. प्रसारमाध्यमांमधून या आंब्याची काही दिवसांपूर्वी खूपच चर्चा झाली होती.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी