संपूर्ण तहसील मुलींनी भरलेला तरीही गर्लफ्रेंड नाही मला; प्रेमाचा गुलकंद खाणाऱ्या तरुणांची आमदाराला हाक

भूषण जमुवंतचे आमदराला पाठवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार सुभाष धोटे यांना मराठीत लिहिलेल्या पत्रात भूषण जमुवंत यांनी आपली व्यथा मांडली आणि नंतर धोटे यांच्याकडे प्रेयसी मिळवण्यासाठी मदत मागितली.

frustrated youth wrote letter to mla for getting girl friend
frustrated youth wrote letter to mla for getting girl friend   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भूषण जमुवंतचे आमदराला पाठवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • प्रेयसी नसल्याने तरुणाचा आत्मविश्वास कमकुवत झाला आहे.
  • दारू विकणाऱ्या लोकांच्या मैत्रिणी आहेत... कुरूप दिसणाऱ्यांच्याही मैत्रिणी आहेत.

चंद्रपूर : प्रेमाचा गुलकंद ही कविता आपण वाचली असेल. ही कविता वाचतना आपण प्रेम न मिळणाऱ्या युवकाची थट्टा देखील केली. परंतु आयुष्यात प्रेम नाही मिळालं तर व्यक्ती किती उदास होतो, याची कल्पना फक्त तशाच तरुणांना होऊ शकते, ज्यांना भर तरुण वयात प्रेयसी मिळत नाही. कवितेत प्रेमासाठी व्याकुळ तरुणासारख्याच एका तरुणांनी आपली व्यथा थेट लोकप्रतिनिधी आमदाराकडे मांडली आहे. आमदाराला पत्र लिहून त्यांना आपल्या दर्दी दिलची काहणी लिहिली आहे. ही घटना घडली आहे आपल्या चंद्रपूरमध्ये. चंद्रपूर येथील आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहून एका युवकाने गर्लफ्रेंडची मागणी केली आहे. प्रेमासाठी व्याकूळ असलेल्या तरुणाचे नाव आहे, भूषण जमुवंत. 

भूषण जमुवंतचे आमदाराला पाठवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार सुभाष धोटे यांना मराठीत लिहिलेल्या पत्रात भूषण जमुवंत यांनी आपली व्यथा मांडली आणि नंतर धोटे यांच्याकडे प्रेयसी मिळवण्यासाठी मदत मागितली आहे. ही विचित्र मागणी पाहून आमदाराही हैराण झाले आहेत. त्या तरुणाला कसे समजावून सांगावे  आणि त्याची मदत कशी करावी हे त्यांना समजत नाहीये.

तरूणाने पत्रात लिहिले आहे की, 'संपूर्ण तहसील मुलींनी भरलेला आहे, पण तरीही मला कोणतीही गर्लफ्रेंड नाही. ही चिंतेची बाब आहे. यामुळे माझा आत्मविश्वास कमकुवत झाला आहे, मी राजुरा ते ग्रामीण भागातील गडचांदूर पर्यंत प्रवास करतो, एकही मुलगी माझ्या सोबत येत नाही...'तरुणाने पत्रात म्हटले आहे की, दारू विकणाऱ्या लोकांच्या मैत्रिणी आहेत... कुरूप दिसणाऱ्यांच्याही मैत्रिणी आहेत.. अशा मुलांना पाहून मला वाईट वाटतं.., माझी विनंती आहे की, तुम्ही तुमच्या मतदारसंघातील मुलींना प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून ते आमच्यासारख्या मुलांचा आदर करतील...'

यावर आमदार धोटे यांना अद्याप पत्र पोस्टाने आलेले नाही. पण त्यांच्या हाती व्हाट्सऍपद्वाचे मेसेज पोहोचला आहे. युवकाच्या पत्रावर ते म्हणाले, 'भूषण जामुवंत कोण आहे. कुठे राहतो. या तरुणाच्या शोधात कार्यकर्ते आहेत आणि मी त्याला भेटताच त्याच्याशी बोलेल...' असं देखील आमदार म्हाणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी