Maharashtra Memes: राज्यातील राजकीय नाट्यावरून सोशल मीडियावर अनेक Memes व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Nov 27, 2019 | 14:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra Politics memes and Jokes:राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता ठाकरेंचं सरकार स्थापन होणार आहे.या राजकीय नाट्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहे.

Memes Viral
राज्यात घडलेल्या राजकीय नाट्यावर सोशल मीडियावर धुमाकूळ  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रातील राजकारणावर सोशल मीडिया सक्रिय
  • देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर अनेक जोक्स व्हायरल
  • देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि भाजपवर अनेक मीम्स व्हायरल

मुंबई: मागील महिन्याभरात राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर समारोप होतोय. राज्याला आता ठाकरे सरकार मिळतंय. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक घेतलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीनंतर राज्यात राजकीय भूकंप आला होता. मात्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार जास्त टिकलं नाही, अवघ्या साडे तीन दिवसांमध्येच दोघांनीही राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. आता राज्याला महाविकासआघाडीचं अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार मिळतंय. गुरूवारी २८ नोव्हेंबर २०१९ ला शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या फजितीमुळे सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला जातोय. राज्यातील या संपूर्ण नाट्यमय घडामोडींवर अनेक जोक्स आणि मीम्स व्हायरल होत आहे. #MaharashtraPoliticalDrama हे हॅशटॅग ट्विटर वर टॉप ट्रेंड होतंय.

तर मग पाहा राज्यातील घडामोडींवर व्हायरल होत असलेले मीम्स आणि जोक्स...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मागील एक महिन्यापासून राज्यातील राजकारणावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळी शपथ घेतल्यानंतरही अनेक मीम्स व्हायरल झाले होते आणि आता यावर कळस चढवत घडलेली घडामोड म्हणजे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी