केकमध्ये अंडे आहे हे सांगण्यासाठी नागपूरच्या बेकरीने केले असे काही की ग्राहक चक्रावला

Funny mistake of the bakery in Nagpur person asked will there be an egg in the cake bakery wrote Contain Egg on the cake itself : नागपूरच्या बेकरीने ग्राहकाला केक पाठवला आणि केकमध्ये अंडे आहे की नाही हे सांगण्यासाठी जे केले ते पाहून ग्राहक चक्रावला

Funny mistake of the bakery in Nagpur person asked will there be an egg in the cake bakery wrote Contain Egg on the cake itself
केकमध्ये अंडे आहे हे सांगण्यासाठी नागपूरच्या बेकरीने केले असे काही की ग्राहक चक्रावला 
थोडं पण कामाचं
  • केकमध्ये अंडे आहे हे सांगण्यासाठी नागपूरच्या बेकरीने केले असे काही की ग्राहक चक्रावला
  • ग्राहकाने केकचा फोटो काढून ट्वीट केला
  • फोटो व्हायरल

Funny mistake of the bakery in Nagpur person asked will there be an egg in the cake bakery wrote Contain Egg on the cake itself : नागपूर : कोणताही आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी केक खाणे कोणाला आवडत नाही... पण हल्ली अनेक ग्राहक केकमध्ये अंडे आहे की नाही हे जाणून घेण्यास उत्सुक असतात. केकचे विक्रेते या संदर्भातील माहिती देतात यानंतरच ग्राहक केक खरेदी करतात. पण नागपूरमध्ये एक चक्रावून टाकणारा प्रकार घडला.

कपिल वासनिक यांनी नागपूरच्या एका प्रसिद्ध बेकरीकडे स्विगीच्या माध्यमातून केकची ऑर्डर दिली. केकमध्ये अंडे आहे की नाही ते सांगा अशी मागणीही वासनिक यांनी केली. उत्तरादाखल बेकरीने थेट केक पाठवून दिला आणि अंडे आहे की नाही याची माहिती अशा पद्धतीने दिली की वासनिक चक्रावले. त्यांनी केकचा फोटो काढून ट्वीट केला. हा फोटो व्हायरल होत आहे.

बेकरीतून पाठविण्यात आलेल्या केकवर व्हिप क्रीमच्या मदतीने अंडे आहे असे इंग्रजीत लिहिले होते. केकमध्ये अंडे आहे हे सांगण्यासाठी बेकरीकडून हा उद्योग करण्यात आल्याचे पाहून कपिल वासनिक चक्रावले, त्यांनी केकचा फोटो काढून ट्वीट केला. हा फोटो पाहून आता अनेकजण ट्विटरवर त्यांचे केकविषयीचे चांगले वाईट अनुभव शेअर करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी