झोमॅटोचं ट्वीट व्हायरल! ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकांनी केलं झोमॅटोला कॉपी

व्हायरल झालं जी
Updated Jul 09, 2019 | 18:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

झोमॅटो अॅपद्वारे लोकं ऑनलाईन जेवण ऑर्डर करत असतात. सध्या सोशल मीडियावर झोमॅटो अॅपचं एक ट्वीट झपाट्यानं व्हायरल होतंय. या फनी ट्विटची कॉपी करत सोशल मीडियावर अनेक जण शेअर करत आहेत. पाहा कसं आहे हे ट्वीट..

Zomato
सोशल मीडियावर झोमॅटोचं फनी ट्विट व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: घरात स्वयंपाक करून कंटाळा आला की लोक बाहेरून जेवण मागवतात. बाहेरून जेवण मागविण्यासाठी अनेक ऑनलाईन अॅप सध्या उपलब्ध आहेत. त्यातीलच एक अॅप म्हणजे झोमॅटो. सध्या झोमॅटोचं एक ट्वीट सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतंय. हे ट्वीट लोकांना खूप आवडलं असून अनेक जण ते कॉपी करत त्यावर फनी रिप्लाय देत आहेत. झोमॅटोनं फनी ट्वीट करत लिहिलंय, ‘कधी-कधी घरचं जेवण पण खात जा’. जेवण ऑर्डर करता येणाऱ्या अॅपनं केलेलं हे ट्वीट यूजर्स खूप मस्तीत घेत आहेत. एव्हढंच नव्हे तर झोमॅटोच्या या ट्विटची कॉपी अनेक ब्रांड्सनी केलीय. अनेक ब्रांड्स या ट्विटच्या धर्तीवर अनेक ट्वीट करत आहेत.

यूट्यूबच्या ऑफिशिअल अकाऊंटनं सुद्धा अशाच प्रकारचं ट्वीट केलं, ‘कधी-कधी रात्री तीन वाजता, फोन बाजूला ठेवला पाहिजे.’

 

 

 

 

तर ट्रॅव्हल आणि हॉटेल बुकिंग वेबसाईट Ixigo नं ट्वीट केलं की, ‘मित्रांनो कधी-कधी घरी पण बसायला पाहिजे’.

 

 

अॅमेझॉन प्राईम इंडियानं सुद्धा या ट्विटवर प्रतिक्रिया देत, तशाच प्रकारचं ट्विट केलं. त्यांनी लिहिलं, ‘कधी-कधी केबल पण बघायला पाहिजे’.

 

 

MobiKwik नं सुद्धा याबाबत फनी ट्विट करत लिहिलं, ‘अॅपच्या बाजारात कधी-कधी रांगेत लागून वीजेचं बिल भरायला पाहिजे’.

 

 

झोमॅटो इंडियाच्या या ट्विटला लोकं खूप पसंत करत आहेत. या ट्विटला आतापर्यंत १९ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यूजर्स या ट्विटबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

 

एव्हढंच नव्हे तर जेव्हा दुसऱ्या ब्राँड्सनी झोमॅटोचं ट्वीट कॉपी केलं तेव्हा झोमॅटोनं पुन्हा आपल्या अंदाजात फनी उत्तर लिहिलंय. झोमॅटोनं उत्तरादाखल ट्वीट करत म्हटलं, ‘कधी-कधी चांगल्या ट्विटबाबत पण विचार करायला पाहिजे’.

यापूर्वी फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या झोमॅटोला कोर्टानं दंड ठोठावला होता. कारण उपवास असलेल्या एका व्यक्तीला झोमॅटोनं नॉन-व्हेज जेवण डिलिव्हर केलं होतं. ही मुंबईत घडलेली धक्कादायक घटना होती. त्याविरोधात पुण्यातील ग्राहक फोरमनं झोमॅटोवर ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. ग्राहक फोरमनं झोमॅटोसोबतच हॉटेलला सुद्धा दंड ठोठावला होता.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
झोमॅटोचं ट्वीट व्हायरल! ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकांनी केलं झोमॅटोला कॉपी Description: झोमॅटो अॅपद्वारे लोकं ऑनलाईन जेवण ऑर्डर करत असतात. सध्या सोशल मीडियावर झोमॅटो अॅपचं एक ट्वीट झपाट्यानं व्हायरल होतंय. या फनी ट्विटची कॉपी करत सोशल मीडियावर अनेक जण शेअर करत आहेत. पाहा कसं आहे हे ट्वीट..
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola