Viral Video : मेंढयासोबतची मस्ती भोवली, व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Mar 28, 2023 | 18:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Man And Sheep Fight : इनस्टाग्राम वर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. एक बुटका व्यक्ती मेंढयाला विनाकारण सतवत असताना दिसून येते, मग पुढे मेंढयाने जी त्याची मस्ती उतरवली ती पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल. . 

Sheep And Man Funny Video :
मेंढयाला विनाकारण त्रास देत होता...  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • मेंढयासोबतची मस्ती भोवली
  • एक बुटका माणूस आणि मेंढयाची लढत
  • व्हिडिओ व्हायरल

Sheep And Man Funny Video : सोशल मीडिया वर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल काही सांगता येत नाही, आणि त्यात जर तुम्ही रील्स चे वेडे असाल तर असे काही हटके व्हिडिओज पाहायला मिळतात, जे वारंवार पाहत राहवेसे वाटतात. असाच एक गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, की तुम्ही त्याचा मनसोक्त आनंद लुटाल. 

अधिक वाचा : ​LIC मध्ये तुम्ही स्वतः करु शकता नवीन ग्राहकांसाठी नोंदणी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक बुटकी व्यक्ती मेंढयाला त्रास देताना दिसत आहे. सुरुवातीला मेंढयाने त्याची ही मस्ती सहन केली. मात्र बऱ्याच वेळानंतर त्याने त्या व्यक्तीची चांगलीच मज्जा उतरवली. हा व्हिडिओ इतका गंमतीदार आहे की पाहणारा वारंवार बघत बसतो. त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी मेंढयाने आपल्या शिंगाने त्याच्यावर हल्ला केला, आणि तो व्यक्ति एका बॉलसारखा उडून दुसरीकडे जाऊन पडला. हा व्हीडियो बघणाऱ्यांना खूप हसवतो. 

पहा हा व्हीडियो- 

 

अधिक वाचा : IPL 2023 सुरू होण्यापूर्वी RCB ला पहिला झटका

मेंढा आणि माणसाचा व्हिडियो 

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.  एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'जर तुम्ही एखाद्याला विनाकारण त्रास दिला तर त्याचा परिणाम असाच होणार'. तर दुसर्‍या व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले की, 'बरं झालं, याला असंच पाहिजे होतं, म्हणून कधी कोणालाही त्रास देऊ नये'. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचवेळी, तो अनेक वेळा शेअर देखील करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 'bjjcalisthenics' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.      

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी