'गॉडझिला गेला खरेदीला': महाकाय मॉनिटर लिझर्डने थायलंडच्या सुपरमार्केटमध्ये घातला गोंधळ

थायलंडमधील 7 इलेव्हन स्टोअरमध्ये हे भयंकर दृष्य चित्रित झाले आहे आणि थायलंडच्या मंडो नोमाडा या ट्रॅव्हल एजन्सीने या भयंकर घटनेचा व्हिडिओ ऑनलाईन शेअर केला आहे ज्यात एक मॉनिटर लिझर्ड सुपरमार्केटमध्ये आला आहे.

??????? ?????? ?? ??????? ????, 2 ????? ?? ???? ????? ??? ?? ??? ???? ????
सुपरमार्केटमधल्या शेल्फवर चढताना चित्रित झाला भयंकर प्रकार 

थोडं पण कामाचं

  • शेल्फवरील वस्तू पाडून वर चढून बसला हा भयंकर प्राणी
  •  इथे पाहा या भयानक प्राण्याचा शॉपिंगचा व्हिडिओ
  • मॉनिटर लिझर्ड आढळणे ही सामान्य गोष्टच

Monitor lizards : जगभरातील (World) चित्रपटांच्या चाहत्यांच्या (film fans) स्मरणात गॉडझिला व्हर्सेस काँगच्या (Godzilla vs. Kong) आठवणी (memories) अजुनी ताज्या (fresh) आहेत. मात्र इथे आपण जे पाहणार आहात त्यामुळे आपल्याला हे चित्रपट पुन्हा एकदा पाहण्याची किंवा मोठ्या पालींच्या (big lizards) प्रजातींबद्दल वाचण्याची तीव्र इच्छा होईल. सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होत असलेल्या एका व्हिडिओत (video) एक मॉनिटर लिझर्ड (monitor lizard) थायलंडच्या (Thailand) एका सुपरमार्केटमध्ये (supermarket) शेल्फांवर चढताना आणि तिथल्या वस्तू खाली पडताना दिसत आहे.

शेल्फवरील वस्तू पाडून वर चढून बसला हा भयंकर प्राणी

थायलंडमधील 7 इलेव्हन स्टोअरमध्ये हे भयंकर दृष्य चित्रित झाले आहे आणि थायलंडच्या मंडो नोमाडा या ट्रॅव्हल एजन्सीने या भयंकर घटनेचा व्हिडिओ ऑनलाईन शेअर केला आहे ज्यात एक मॉनिटर लिझर्ड सुपरमार्केटमध्ये आला आहे. यात ही महाकाय मॉनिटर लिझर्ड शेल्फवर चढताना, तिथल्या पाकीटबंद वस्तू खाली पाडताना आणि वर चढून बसताना दिसत आहे. आपली जीभ आतबाहेर काढत तो सर्व दुकानभर नजर फिरवत आहे.

 

 

इथे पाहा या भयानक प्राण्याचा शॉपिंगचा व्हिडिओ

ट्विटरवरून हा व्हिडिओ डिलीट केला जाण्याच्या आधी या मूळ व्हिडिओला आत्तापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आता या व्हिडिओची क्लिप फेसबुक आणि यूट्यूबवर दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी ही मॉनिटर लिझर्ड शेल्फवर चढून तिथे आरामात बसलेली दिसते आणि दुकानातील लोक भयचकित होऊन तिच्याकडे पाहात आहेत.

मॉनिटर लिझर्ड आढळणे ही सामान्य गोष्टच

या ट्वीटनंतर स्पष्टीकरण देताना मंडो नोमाडाने सांगितले आहे की बँकॉकमध्ये मॉनिटर लिझर्ड आढळणे ही सामान्य बाब आहे, मात्र अशाप्रकारे सुपरमार्केटमध्ये या प्राण्याचे येणे दुर्मिळच आहे. मृत प्राण्यांच्या सडलेल्या समांसावर जगणारा हा प्राणी भयानक दिसत असला तरी मानवांसाठी धोकादायक नसल्याचे मिशिगन विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातील तज्ञांनी सांगितले आहे. काही स्थानिकांच्या मते बाहेरच्या वातावरणातील उष्णता टाळण्यासाठी हा प्राणी आत आला असल्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी