Viral News : महाकाय अजगरानं 54 वर्षाच्या महिलेला दोन तासात गिळलं, अजगराचं पोट फाडून काढला मृतदेह

'मिरर.को.यूके'च्या रिपोर्टनुसार, वृद्ध महिलेच्या तेर्जुन गजाह (Terjun Gajah)गावातील सरपंच अँटो यांनी सांगितले की, अजगराने आधी वृद्ध महिलेला चावा घेतला आणि नंतर महिलेचा जीव जाण्यासाठी तिला विळखा घातला.  महिला मृत झाल्यानंतर अजराने तिला गिळलं. या महिलेला पूर्ण गिळण्यासाठी अजराला दोन तास लागले असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

A giant python swallowed a 54-year-old woman in two hours
महाकाय अजगरानं 54 वर्षाच्या महिलेला दोन तासात गिळलं  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • इंडोनेशिया आणि आग्नेय आशियातील इतर भागांमध्ये अजगर मोठ्या प्रमाणात आढळतात.
  • अजगराने आधी वृद्ध महिलेला चावा घेतला आणि नंतर महिलेचा जीव जाण्यासाठी तिला विळखा घातला.
  • महाकाय अजगर पाहिल्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.

इंडोनेशिया :  साप (snake) दिसला तरी आपले पाय जिकडे भुई सापडेल तिकडे पळू लागतात. सापाची चपळाई आपल्याला ठाऊक आहे, पापणी लागेपर्यंत साप आपल्या डोळ्यासमोरुन निसटून जातो. त्याच जागेवर अजगर असला तर आपण त्याला सुस्थ प्राणी म्हणतो. परंतु इंडोनिशियामध्ये (Indonesia)एका अजगरने येथील नागरिकांचा थरकाप उडवला आहे. येथील एका 54 वर्षाच्या महिलेला महाकाय अजगराने गिळलं आहे. (Giant python swallows 54-year-old woman in two hours)

अधिक वाचा  : या वर्षी पुढील सूर्यग्रहण कधी होणार?, वाचा Details मध्ये

गावातील ही महिला रबर गोळा करण्यास गेली जंगलात गेली होती. बराच वेळ झाला तरी महिला घरी परतली नाही. त्यानंतर घरच्यांनी आणि रहिवाशांनी तिचा शोध सुरू केला. त्याचवेळी त्यांना 22 फूट लांब अजगर दिसला. याच अजगराने महिलेला गिळलं असल्याची शंका नागरिकांना आली. त्यानंतर अजगराला मारत त्याच्या पोटातून महिलेचा मृतदेह (dead body) बाहेर काढण्यात आला. दरम्यान सोशल मीडिया (Social media)वर या अजगराचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. 

अधिक वाचा  : शिक्षक बनला नराधम, सहावीमधील 11 मुलींचा विनयभंग

'मिरर.को.यूके'च्या रिपोर्टनुसार, वृद्ध महिलेच्या तेर्जुन गजाह (Terjun Gajah)गावातील सरपंच अँटो यांनी सांगितले की, अजगराने आधी वृद्ध महिलेला चावा घेतला आणि नंतर महिलेचा जीव जाण्यासाठी तिला विळखा घातला.  महिला मृत झाल्यानंतर अजराने तिला गिळलं. या महिलेला पूर्ण गिळण्यासाठी अजराला दोन तास लागले असतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

सोशल मीडियावर अजगराचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तुम्ही त्याचे फुगलेले पोट पाहू शकता. तर काही फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक अजगराचे पोट फाडून महिलेचा मृतदेह बाहेर काढत असल्याचे दिसत आहे. मृत झालेली महिला शुक्रवारी झाडावरुन रबर काढण्यासाठी रानात गेली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. परंतु बराच वेळ झाला तरी ती महिला घरी परतली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना नागरिकांना पोट फुगलेला एक 22 फूट लांब अजगर दिसला.

python

या अजगराने महिलेला गिळलं असावं असा संशय नागरिकांना आला. त्यानंतर नागरिकांनी त्या अजगराला ठार मारत त्याच्या पोटातून महिलाचा मृतदेह बाहेर काढला. ते दृश्य पाहून गावातील सर्व नागरीक स्थब्ध झाले होते. गावाचे सरपंच म्हणाले की, गावातील कोणत्याच व्यक्तीने महिलेला अजगर गिळत आहे,असं पाहिलं नाही. कारण महिला एकटी जंगलात गेली होती. परंतु महाकाय अजगर पाहिल्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. 

दरम्यान, इंडोनेशिया आणि आग्नेय आशियातील इतर भागांमध्ये अजगर मोठ्या प्रमाणात आढळतात. हे अजगर त्यांच्या डझनभर तीक्ष्ण वक्र दातांनी आपला शिकार पकडतात आणि नंतर संपूर्ण गिळण्यापूर्वी त्यांना गुदमरुन मारुन टाकतात. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी