Viral Video | गुगल मॅप्सवर दिसला जगातील सर्वात विशालकाय सापाचा सांगाडा, टायटॅनोबोआ अस्तित्वात असल्याची चर्चा, पाहा व्हिडिओ, पण...

TikTok Video : गुगल मॅप्स (Google Maps) वर जगातील काही अद्भूत गोष्टी दिसून येतात. जगाचे निरीक्षण केल्यास तुम्हाला काही विलक्षण, आश्चर्यकारक आणि विचित्र गोष्टी शोधता येऊ शकतात. एरवी काही गुगल मॅप्स अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. मात्र त्यातून काही वेळा अत्यंत धक्कादायक बाबीदेखील समोर येत असतात. सर्वसामान्यांमध्ये या गोष्टीची मोठी चर्चा होत असते. सध्या फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ एक प्रचंड 'सापाचा सांगाडा' (Giant snake skeleton)दिसल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.

Giant 'Snake Skeleton' On Google Maps
गुगल मॅप्सवर दिसला विशालकाय सापाचा सापळा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • टिकटॉकवरील विशालकाय सापाच्या सापळ्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
  • गुगल मॅम्पसवर दिसला फ्रान्सच्या किनाऱ्यावर विशालकाय सापाचा सापळा
  • टिकटॉकवरील हा व्हिडिओ झाला व्हायरल

Google Maps Sparks Titanoboa Theories : नवी दिल्ली : गुगल मॅप्स (Google Maps) वर जगातील काही अद्भूत गोष्टी दिसून येतात. जगाचे निरीक्षण केल्यास तुम्हाला काही विलक्षण, आश्चर्यकारक आणि विचित्र गोष्टी शोधता येऊ शकतात. एरवी काही गुगल मॅप्स अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. मात्र त्यातून काही वेळा अत्यंत धक्कादायक बाबीदेखील समोर येत असतात. सर्वसामान्यांमध्ये या गोष्टीची मोठी चर्चा होत असते. सध्या फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ एक प्रचंड 'सापाचा सांगाडा' (Giant snake skeleton)दिसल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे. इंडिपेंडंटनुसार, @googlemapsfun नावाचे एक TikTok खाते गुगल मॅप्सवर शोध घेताना त्यांना सापडलेल्या गोष्टींचे व्हिडिओ शेअर करते. 24 मार्च रोजी, या टिकटॉक अकाउंटने फ्रान्सच्या किनारपट्टीवर सापडलेल्या एका विशाल सापासारख्या वस्तूचा व्हिडिओ शेअर केला. (Giant snake skeleton found on Google Maps, video shared by TikTok starts Titanoboa Theories)

अधिक वाचा : Baba Ramdev Viral Video | पेट्रोल, डिझेल दरवाढीचा विषय काढला, तर रामदेव बाबा म्हणतात...'असे प्रश्न विचारू नका', पाहा व्हिडिओ

फ्रान्सच्या किनाऱ्यावर आढळला महाकाय साप

"फ्रान्समध्ये कुठेतरी, आम्ही गुगल अर्थ (Google Earth) वर लपलेले, आपण केवळ उपग्रहांसह पाहू शकता असे काहीतरी राक्षस पाहू शकतो," असे हे टिकटॉक अकाउंट म्हणते. "युजर्सचा असा विश्वास आहे की हा एक महाकाय साप आहे. तो सुमारे 30 मीटर लांब आणि आधी पकडलेल्या कोणत्याही सापापेक्षा मोठा आहे."

अधिक वाचा : साहेब! लग्नाचा वाढदिवस नाहीतर पश्चाताप दिन साजरा करण्यासाठी सुट्टी द्या; पोलीस दादाचा अर्ज होतोय व्हायरल

टिकटॉकवरील व्हिडिओ झाला व्हायरल

googlemapsfun नावाच्या या ट्विटर अकाउंटने असेही सुचवले आहे की सापाचा सांगाडा नामशेष झालेल्या टायटॅनोबोआचा असू शकतो. टायटॅनोबोआ ही एक अत्यंत मोठ्या सापांची एक प्रजाती आहे.  TikTok वर 20 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूजसह हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गुगल मॅप्सवर एक सापासारखी वस्तू पाहिली जाऊ शकते (तुम्ही ते येथे पाहू शकता), या कथेमध्ये तुमच्या डोळ्यांना दिसत असण्यापेक्षा आणखी बरेच काही आहे. सापाच्या या महाकाय सापळ्याबद्दल तुम्हाला आणखी खास माहिती समोर येते.

स्नॉप्सच्या व्हायरल क्लिपच्या तपासणीत असे आढळून आले की 'सापाचा सांगाडा' प्रत्यक्षात एक "मोठे, धातूचे शिल्प आहे जे ले सर्पेंट डी'ओशन म्हणून ओळखले जाते." हे शिल्प फ्रान्सच्या पश्चिम किनार्‍यावर स्थित आहे आणि त्याची उंची तब्बल 425 फूट आहे. शेवटी, गुगल मॅपवर दिसणारा 'सापाचा सांगाडा' ही प्रत्यक्षात एक कलाकृती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा : Empty Plastic Bottles: रिकामी प्लास्टिकची बॉटल द्या आणि करा मोफत प्रवास; इथे सुरू आहे स्कीम

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर असे अद्भूत, आश्चर्यकारक किंवा माहितीत भर घालणारे असंख्य व्हिडिओ समोर येत असतात. त्यात गुगल मॅप्ससारख्या साधनामुळे सर्वसामान्यांना आता अनेक गोष्टी घरबसल्या पाहता येतात. टिकटॉकवरील व्हिडिओ तर सोशल मीडियावर फारच व्हायरल होत असतात. नेटकरी आणि सोशल मीडिया युजर्स असे व्हिडिओ लगेच शेअर करत असतात. सोशल मीडिया नेटवर्कमुळे एखादा अनोखा व्हिडिओ व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. मात्र अनेक वेळा प्रथमदर्शनी या व्हिडिओमधून जे दिसते सत्य तसेच असते असे मात्र नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी