मेट्रोमध्ये चिमुकल्या मुलीचा मस्त डान्स, पण मागे उभ्या असलेल्या मुलाने जिंकले मने

तुम्ही मेट्रोने प्रवास करत असाल तर तुम्हाला रोज वेगवेगळ्या प्रकारची माणसं मेट्रोत पाहायला मिळतील. मेट्रोमध्ये अनेक वेळा अशी दृश्ये पाहायला मिळतात, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका चिमुकली मुलीचा डान्स आहे. परंतु डान्सपेक्षा तिच्या पाठीमागे उभ्या असलेल्या मुलामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

girl's cool dance goes viral in the metro
मेट्रोमध्ये चिमुकल्या मुलीचा मस्त डान्स व्हायरल  |  फोटो सौजन्य: Instagram

नवी दिल्ली : जर तुम्ही मेट्रोने प्रवास करत असाल तर तुम्हाला रोज वेगवेगळ्या प्रकारची माणसं मेट्रोत पाहायला मिळतील. मेट्रोमध्ये अनेक वेळा अशी दृश्ये पाहायला मिळतात, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एका चिमुकली मुलीचा डान्स आहे. परंतु डान्सपेक्षा तिच्या पाठीमागे उभ्या असलेल्या मुलामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

आजकाल ट्रेंडिंग गाण्यावर मेट्रोमध्ये चिमुरड्या मुलीने डान्स केला आहे. या मुलीच्या मागे एक मुलगा त्याच्या मैत्रिणींसह उभा आहे. मुलगी डान्स सुरू करताच मुलाने असे काही केले, जे पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गाणे सुरू होताच एक लहान मुलगी 'गोमी गोमी' गाण्यावर नाचू लागते. त्याचवेळी त्या मुलासोबत मागे उभ्या असलेल्या दोन मुली कॅमेरा चालू पाहून तिथून दूर दुसऱ्या बाजूला जातात. पण मुलगा तिथेच उभा राहतो आणि तोही त्या चिमुरडीच्या मागे नाचू लागतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Voompla (@voompla)

मुलगी आणि तिच्या मागे उभ्या असलेल्या मुलाचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर क्युट आणि लवली अशा कमेंट करत आहेत. त्याच वेळी, मुलगी वगळता बहुतेक लोक मुलाचे कौतुक करताना दिसत आहेत.  समायरा असे या मुलीचे नाव सांगितले जात आहे. व्हिडिओवर टिप्पणी करताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, "मागचा मुलगा बाळापेक्षा अधिक गोंडस दिसत आहे". दरम्यान या व्हिडिओला 6 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी