VIRAL VIDEO: गाईसमोर 'मार डाला' गाण्यावर थिरकली अन् मग गाईने तिची चांगलीच जिरवली, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Viral Video of Girl dance in front of cow: सोशल मीडियात दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक मुलगी गाईसमोर 'मार डाला गाण्यावर' डान्स करताना दिसत आहे. 

girl dance on maar daala song but upset cow hits her badly Instagram video goes viral watch it
VIRAL VIDEO: गाईसमोर 'मार डाला' गाण्यावर थिरकली अन् मग गाईने तिची चांगलीच जिरवली, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • देवदास सिनेमातील 'मार डाला...' गाण्यावर तरुणीने केला डान्स
  • गाईसमोर केलेला डान्स आणि मग घडलं असं काही की....
  • इंस्टाग्रामवरील व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Girl badly hit by cow : देवदास सिनेमातील 'मार डाला...' हे गाण तुम्हाला माहितीच असेल. याच गाण्यावर अनेक जण इंस्टाग्रामवरील रील्स सुद्धा बनवतात. अशाच प्रकारे एका मुलीने इंस्टाग्रामवर एक रील बनवून अपलोड केला आहे. जो तुफान व्हायरल (Instagram reel video goes viral in social media) होत आहे. हा रील ३ जुलै रोजी शेअर करण्यात आला आणि अवघ्या काही दिवसांतच त्या रीलला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (girl dance on maar daala song but upset cow hits her badly Instagram video goes viral watch it)

या रीलच्या वर लिहिलं आहे की, 'और दीदी... आ गया स्वाद' रील सुरू होताच ही मुलगी गाईला चारा देत होती. त्यानंतर ही मुलगी त्या गाईसमोर गाणं गात डान्स सुरू करते. देवदास सिनेमातील 'मार डाला...' (Maar Daala song of movie Devdas) या गाण्यावर ही तरुणी गाईसमोर डान्स करत असते. पण अवघ्या काही सेकंदांतच गाय नाराज होते आणि या तरुणीवर हल्ला चढवते.

गाय आपल्या शिंगाने तरुणीला धक्का देऊन पाडते. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यावर युजर्सही मोठ्या प्रमाणात कमेंट्सही करत आहेत. एका युजरने लिहिलं की, डान्स मूव्ह्समुळे गाय संतापली आणि तिने असं केलं. तर दुसऱ्या युजरने म्हटलं, या तरुणीने सुंदर डान्स केला आहे.

अधिक वाचा : Naag Nagin Love Video: नाग नागिणीची प्रणयदृष्ये कॅमेर्‍यात कैद, व्हिडीओ व्हायरल

तिसऱ्या युजरने गाण्याचा संदर्भ दिला आणि म्हटलं आहे, "हा... हा... हा... मार ही डाला..." काहींनी हे तथ्यही निदर्शनास आणले की, रीलमधील गाय प्राणी असल्याने हे कॅप्शनच चुकीचे होते.

अधिक वाचा : Optical Illusion:  या फोटोत लपला आहे पोपट, १५ सेकंदात शोधून दाखवण्याचे आहे चॅलेंज

अशाच प्रकारचा एक व्हिडिओ २०२० मध्ये व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक महिला आपल्या गुरांसोबत होता. ही महिला सुरुवातीला एका गाण्यावर थिरकण्यास सुरुवात करते आणि त्यानतंर म्हशीलाही आपल्यासोबत गाण्यावर नाचायला लावण्याचा प्रयत्न करते. त्यानतंर म्हैस सुद्धा त्या महिलेसोबत गाण्यावर थिरकण्यास सुरवात करते. म्हैस मान डोलावत त्या महिलेला प्रतिसाद देताना दिसून येते. ते पाहून तेथे जमलेल्या स्त्रिया आणि मुलांना हसू आवरत नाही आणि ते सुद्धा हसू लागतात.

एका व्यक्तीने कमेंट सेक्सनमध्ये लिहिलं की, तो हिमाचल प्रदेशचा आहे. त्यांच्या मते, ही दृश्ये अगदी सामान्य आहेत. हिमाचल प्रदेशात लोक त्यांच्या गुराढोरांवर खूप प्रेम करतात असंही त्याने म्हटलं आहे. आणखी एका युजरने गमतीशीरपणे लिहिलं की, म्हशीने बॉलिवूडमध्ये काम करण्याचा प्रयत्न करावा. तर काही युजर्सने म्हटलं की, ही म्हैस अनेक नामांकित अभिनेत्यांपेक्षाही खूप चांगलं नृत्य करते. या व्हिडिओजला १२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी