Girl lift Lion : तरुणीने सिंहाला घेतले कडेवर, व्हिडीओ व्हायरल

Girl lift Lion जगात अशा काही घटना घडू शकतात यावर आपला विश्वासच बसत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी सिंहाला उचलून रस्त्यात धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली आहेत.

women and lion
तरुणीने सिंहाला घेतले कडेवर  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियावर कधी काय पहायला मिळेल सांगता येणार नाही.
  • एक तरुणी सिंहाला उचलून रस्त्यात धावताना दिसत आहे.
  • हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली आहेत.

Girl lift Lion : कुवैत : सोशल मीडियावर कधी काय पहायला मिळेल सांगता येणार नाही. कधी कधी काही व्हिडीओ हे खूप विनोदी असतात तर काही व्हिडीओ हे आश्चर्यचकित करणारे असतात. जगात अशा काही घटना घडू शकतात यावर आपला विश्वासच बसत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी सिंहाला उचलून रस्त्यात धावताना दिसत आहे. (girl lift lion like child kuwait video viral on social media) 

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली आहेत. कारण एक व्यक्ती एका सिंहाला उचलून कसा काय घेऊ शकतो, सिंह हा प्राणी अतिशय भयानक आणि हिंस्र असतो. 


हा व्हिडीओ कुवेत देशातला आहे असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका कुटुंबीयांनी हा सिंह पाळला आहे. हा सिंह घरातून पळून गेला. या कुटुंबीयांनी याबद्दल पोलिसांनाही कळवले. नंतर हे वृत्त संपूर्ण शहरात पसरले आणि एक सिंह रस्त्यावर फिरत असल्याचे लोकांना कळाले आणि त्यांची घाबरगुंडी उडाली. पण लवकरच या सिंहाचा शोध घेण्यात आला. जेव्हा या मुलीकडे हा सिंह आला तेव्हा तो एखाद्या बाळासाराख ओरडायला लागला आणि आपली सुटका करण्याचा प्रयत्न करायला लागला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  


'@ramseyboltin' या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३० लाख व्ह्युज मिळाले असून ३६ हजार लाईक्स आले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी