फटाके विकताना वडिलांना पकडल्यावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ, आता त्याच कुटुंबासह पोलिसांनी साजरी केली दिवाळी

व्हायरल झालं जी
Updated Nov 14, 2020 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

काही दिवसांपूर्वीच एका फटाके दुकानदाराच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात तिच्या वडिलांना पोलिसांनी पकडल्यानंतर तिने त्यांना सोडवण्यासाठी साद घातली होती. पोलिसांच्या या कारवाईवर टीकाही झाली होती.

UP police celebrate Diwali with the caught firecracker seller's family
फटाके विकताना पकडल्यावर व्हायरल झाला होता मुलीचा व्हिडिओ, आता त्याच कुटुंबासह पोलिसांनी साजरी केली दिवाळी 

थोडं पण कामाचं

  • काय आहे संपूर्ण प्रकरण?
  • मुलीच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी
  • खुर्जाच्या सब-डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटनी दिली माहिती

बुलंदशहर:  १३ जिल्ह्यांमध्ये (13 districts) संपूर्ण फटाके बंदी (complete ban on firecrackers) झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस (UP police) मोठ्या प्रमाणावर कारवाई (extensive actions) करत आहेत. अनेक ठिकाणी छापे टाकण्यात (many places raided) आले आहेत. बुलंदशहरातील (Bulandshahar) खुर्जामध्ये (Khurja) फटाके जप्त करण्याच्या कारवाईदरम्यान (firecrackers seizing drive) पोलिसांचे अमानुष वर्तन (inhuman behavior of police) हा चर्चेचा विषय (subject of discussion) बनला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

फटाके विकणाऱ्या एका गरीब दुकानदाराला पोलिसांनी पकडले होते ज्यानंतर त्याच्या मुलीने पोलिसांच्या गाडीवर डोके आपटत आपल्या वडिलांना सोडवण्याची साद घातली होती. पण पोलिसांना तिची दया आली नाही आणि त्यांनी तिला दाद दिली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि नंतर प्रशासन कामाला लागले.

मुलीच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना आपल्या चुकीची जाणीव झाली. पोलीस आणि अधिकारी या मुलीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी तिच्या कुटुंबासह दिवाळी साजरी केली.

खुर्जाच्या सब-डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटनी दिली माहिती

पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या दुकानदाराच्या कुटुंबासह दिवाळी साजरी केल्याची माहिती खुर्जाच्या सब-डिव्हिजनल मॅजिस्ट्रेटनी शनिवारी दिली आणि म्हटले की या मुलीमध्ये पोलिसांच्या विरोधात असंतोष निर्माण व्हावा अशी आमची इच्छा नाही. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलण्याचा विचार केला. आम्ही असाही संदेश देऊ इच्छितो की दिवाळी फक्त फटाके फोडूनच नव्हे, तर एका कुटुंबासोबतही साजरी केली जाऊ शकते.

या जिल्ह्यांमध्ये लावण्यात आली आहे बंदी

उत्तर प्रदेशातील १३ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांच्या वापरावर पूर्ण बंदी आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये फक्त ग्रीन फटाके वापरता येणार आहेत. राष्ट्रीय हरित लवादच्या आदेशानंतर सरकारने हे आदेश दिले आहेत. ही बंदी सध्या ३० नोव्हेंबरपर्यंत लागू असणार आहे. यानंतर सरकार यावर निर्णय घेणार आहे. राज्यातील मुजफ्फरनगर, आग्रा, वाराणसी, मेरठ, हापुड, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, मुरादाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, बागपत आणि बुलंदशहर या जिल्ह्यांमध्ये ही बंदी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी