Business by stealing money: बॉयफ्रेंडने चोरलेल्या पैशातून उभा केले बिझनेस, मग म्हणाली, चोरटा नवरा नको गं बाई!

गर्लफ्रेंडच्या पडत्या आणि संकटाच्या काळात तिच्या बॉयफ्रेंडने मदत केली होती. त्यासाठी त्याने पैसेही चोरले. मात्र नंतर या गर्लफ्रेंडने त्याच्याशी लग्न करायला नकार दिला. आपल्याला चोरटा नवरा नको असल्याचं ती या व्हिडिओत म्हणताना दिसते.

Business by stealing money
चोरीचे पैसे हवेत, पण चोर नवरा नको! 
थोडं पण कामाचं
  • आपल्या गर्लफ्रेंडसाठी बॉयफ्रेंडने चोरून चोरून जमवले पैसे
  • त्या पैशातून गर्लफ्रेंडने उभा केला यशस्वी बिझनेस
  • यशस्वी होताच दिली बॉयफ्रेंडला टांग

Business by stealing money: गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड (Girlfriend and boyfriend) यांच्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत असतात. त्यात एखाद्या बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला कशी मदत केली किंवा गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडसाठी किती धाडसी पाऊल उचललं वगैरे संदेश देण्यात आलेले असतात. एकमेकांची मस्करी केल्याचे, पोपट केल्याचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असतात. सध्या मात्र एक भलताच व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडिओदेखील एका गर्लफ्रेंडचाच आहे. तिला तिच्या पडत्या आणि संकटाच्या काळात तिच्या बॉयफ्रेंडने मदत केली होती. त्यासाठी त्याने पैसेही चोरले. मात्र नंतर या गर्लफ्रेंडने त्याच्याशी लग्न करायला नकार दिला. आपल्याला चोरटा नवरा नको असल्याचं ती या व्हिडिओत म्हणताना दिसते. 

गर्लफ्रेंडसाठी चोरले पैसे

या व्हिडिओत तरुणीने सांगितलेल्या गोष्टीनुसार तिचं एका तरुणावर निरतिशय प्रेम होतं. दोघंही एकमेकांना मदत करायला तयार होते. तरुणीला आपला व्यवसाय सुरु करायचा होता. मात्र त्यासाठी आवश्यक असणारे पैसे तिच्याकडे नव्हते. आपली ही अडचण तिने आपल्या बॉयफ्रेंडला सांगितली. त्याने शक्य ती सर्व मदत करण्याचा शब्द तिला दिला. अर्थात, त्यावेळी बॉयफ्रेंडकडेही उत्पन्नाचं कुठलंच साधन नव्हतं. तरीही आपण गर्लफ्रेंडला मदत करायचीच, असा चंग त्याने बांधला होता. त्यासाठी त्याने पैसे चोरायला सुरुवात केली. स्वतःच्या घरातून आणि इतर काही ठिकाणांहून पैसे चोरून चोरून तो गर्लफ्रेंडला आणून देऊ लागला. त्यातून तिने आपला व्यवसाय सुरू केला. 

अधिक वाचा - Viral Video: हायवेवर अचानक सुरू झाला नोटांचा पाऊस, पाहा पोलिसांनी काय केलं

व्यवसायात प्रगती

आपल्या बॉयफ्रेंडने चोरून आणलेल्या पैशांचं भांडवल करत तिने नव्या व्यवसायाला सुरुवात केली. थोड्याच काळात तिच्या बिझनेसला यश येऊ लागलं. तिने प्रचंड मेहनतीने आणि कष्टाने आपला उद्योग उभा केला. काही दिवसातच ती एक यशस्वी उद्योजिका झाली. आता आपल्या बॉयफ्रेंडसोबत ती लग्न करेल आणि सुखाचा संसार करेल, असंच प्रत्येकाला वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात तसं घडलंच नाही. जेव्हा आयुष्याचा निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा गर्लफ्रेंडनं वेगळाच निर्णय घेतला. 

अधिक वाचा - Viral Video : बापरे, ब्रेक फेल झाला आणि मालगाडीचे 53 डबे रुळावरून घसरले

चोरटा नवरा नको

आपण बॉयफ्रेंडने चोरून आणलेल्या पैशांनी आपला व्यवसाय उभा केला, हे जरी खरं असलं, तरी आपल्याला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचं तिने जाहीर केलं. आपल्याला चोरटा नवरा नको आहे, असं तिचं म्हणणं आहे. चोरटा नवरा केला, तर ती आपण केलेली तत्त्वांशी केलेली तडजोड ठरेल, असं तिनं म्हटलं आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू येत आहे, तर अनेकांना बॉयफ्रेंडची दया येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी