प्रियकराचा प्रेयसीसोबत Tik-Tok व्हिडिओ व्हायरल, मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला झाडाला बांधून चोपला!

Tik Tok Video: हैदराबाद शहरात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. कारण एका टिक टॉक व्हिडिओमुळे एका तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबाने झाडाला बांधून चोपल्याचं समोर आलं आहे.

tik tok
प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला झाडाला बांधून चोपला!  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • प्रेयसीसोबतचा टिक-टॉक व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रियकरला मारहाण
  • प्रेयसीच्या कुटुंबीयांनी झाडाला बांधून तरुणाला दिला बेदम चोप
  • प्रेयसीने देखील प्रियकराला चप्पलेनं चोपलं

हैदराबाद: टिक-टॉक अॅप देशभरात भलताच लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे टिक टॉकचं भूत लोकांच्या अक्षरश: डोक्यावर चढलं आहे. खास करुन तरुणाईच्या. सध्या तर दररोज टिक-टॉकविषयी एक तरी बातमी समोर येते आहे. अशातच आता कर्नाटकमधील हैदराबादमधील यादगीर या जिल्ह्यात एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. त्याचं झालं असं की, तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडसोबत टिक-टॉक व्हिडिओ बनवणं बरंच महागात पडलं आहे. कारण त्याने बनवलेला टिक-टॉक व्हिडिओ हा व्हायरल झाला आणि तो थेट पोहचला ते प्रेयसीच्या कुटुंबीयांपर्यंत. पण यामुळे तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या युवकाला करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

प्रेयसीच्या संपूर्ण कुटुंबीयाने त्या युवकाला बेदम मारहाण केली. सुरुवातीला झाडाला बांधून त्यानंतर तरुणाला मारहाण केली. यावेळी धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रेयसीने देखील प्रियकराला चप्पलेने मारहाण केली आहे. ही मुलगी प्रियकराला यासाठी मारहाण करत होती की, त्याने टिक-टॉक व्हिडिओ हा दुसऱ्या सोशल मीडिया साइटवर अपलोड केल होता. ज्यामुळे तो व्हायरल झाला होता. मुलीच्या घरच्यांनी देखील त्यामुळे हा व्हिडिओ पाहिला होता. ज्यामुळे त्यांच्या रिलेशनशीपबाबत तिच्या घरीही माहित पडलं होतं. दुसरीकडे मुलांची असंही म्हणणं आहे की, तिला माहिती नव्हतं की, प्रियकर टिक-टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायचा. दरम्यान, मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव बुगप्पा असं असून तो यादगीर जिल्ह्यातील हालिगेरा गावचा रहिवासी आहे. 

हे दोन्ही प्रेमी जोडपं नेहमीच टिक-टॉक व्हिडिओ शूट करायचे. पण मुलीला हे माहित नव्हतं की तिचा प्रियकर हे व्हिडिओ दुसऱ्या सोशल मीडिया साइटवर शेअर करतो. कर्नाटकच्या हैदरबादमधील यादगीर जिल्हा हा आजही मागासलेलाच आहे. इथे आज देखील सोशल मीडियाबाबत अनेक गैरसमज आहेत. जेव्हा प्रियकर आणि प्रेयसीचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तो सगळ्यात आधी मुलीच्या आईने पाहिला. 

हा व्हिडिओ जेव्हा संपूर्ण गावात व्हायरल झाला त्यानंतर गावातीलच लोकांनी मुलाला झाडाला बांधून त्याला मारहाण केली दरम्यान,मुलाला मारहाण होत असताना त्याची आई त्याला वाचवण्याचा बराच प्रयत्न करत होती. मुलाच्या आईने त्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं आहे. जिथे सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी कोणतीही तक्रार अद्याप दाखल करण्यात आलेली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...