Viral Video: तरुणीच्या अंगलट आला तिचाच मूर्खपणा,लगेच मिळालं कर्माचं फळ, पाहा मजेशीर व्हिडिओ

रस्त्यावरून वाहन चालवत असताना दुसऱ्या वाहनाला लाथ मारून खाली पाडण्याचा प्रयत्न करणारी एक तरुणी आणि या घटनेचा झालेला अंतिम परिणाम याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दुसऱ्या तरुणीला बाईक वरून खाली पाडण्याचा प्रयत्न करत असलेली ही तरुणी पुढच्या क्षणी स्वतः खाली कोसळते.

Viral Video
तरुणीच्या अंगलट आला तिचाच मूर्खपणा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • तरुणीकडून दुसऱ्या तरुणीला लाथ मारून पाडण्याचा प्रयत्न
  • रस्त्यावर चालत्या दुचाकीवर स्टंट करण्याचा प्रयत्न
  • कर्माची लगेच फळं मिळाल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हे मजेशीर असतात तर काही व्हिडिओ हे गंभीर असतात. काही व्हिडिओ मात्र आयुष्याविषयीचे एक तत्त्वज्ञान सांगणारे असतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांमधून आयुष्याबाबतचे अनेक तात्विक समज आणि गैरसमज समोर येत असतात. या व्हिडिओत अशा काही घटना घडताना दिसतात ज्या पाहून हसावे की रडावे, ते कळत नाही. रस्त्यावरून वाहन चालवत असताना (Bike) दुसऱ्या वाहनाला लाथ मारून खाली पाडण्याचा प्रयत्न करणारी एक तरुणी आणि या घटनेचा झालेला अंतिम परिणाम याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दुसऱ्या तरुणीला बाईक वरून खाली पाडण्याचा प्रयत्न करत असलेली ही तरुणी पुढच्या क्षणी स्वतः खाली कोसळते. आपण इतरांना जो त्रास देऊ पाहतो तोच त्रास आपल्याला होत असल्याचे या व्हिडिओतून दिसत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात जोरदार सुरू झाली आहे.

बाईकवरून मारली लाथ

या व्हिडिओत दोन दुचाकी रस्त्याने चाललेल्या दिसतात. एका दुचाकीवर एक तरुणी बसली आहे, जी बाईक चालवत आहे. दुसऱ्या दुचाकीवर दोघेजण बसले आहेत. त्यात तरुण दुचाकी चालवत आहे तर पाठीमागे बसलेली तरुणी दुसऱ्या दुचाकीवरून चाललेल्या तरुणीला लाथ मारून खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ही तरुणी असे का करते आहे, याचे कुठलेही कारण या व्हिडिओतून स्पष्ट होत नाही. मात्र या तरुणीला समोरच्या दुचाकीवरील तरुणीला खाली पाडायचे आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.

अधिक वाचा - जगातील सर्वात उंच टॉवरजवळ लागली आग

करावे तसे भरावे

लाथ मारून दुसऱ्या बाईक वरील तरुणीला खाली पाडण्याचा प्रयत्न करणारी ही तरुणी, स्वतःचाच बॅलन्स हरवून बसते. बाईक चालवत असलेल्या तरुणाला आपल्या पाठीमागे बसलेली तरूणी नेमकी काय करत आहे, याचा बिलकुल अंदाज नसतो. लाथ मारल्यानंतर बाईकला बसणारा धक्का सावरण्याच्या तयारीत तो अजिबातच नसतो. दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला याची कल्पनाच नसल्यामुळे, दुसऱ्या बाईकला लाथ मारण्याचा तरुणीचा अंदाज चुकतो. दुचाकी पासून काही अंतरावर असतानाच ती लाथ मारण्याचा प्रयत्न करते मात्र यामुळे तिचा स्वतःचाच बॅलन्स जातो. अचानक झटका बसल्यामुळे दुचाकीवरून ही तरुणी खाली पडते.

अधिक वाचा - Surrogacy : महिलेने आपल्याच नातीला दिला जन्म, महिला आपल्याच मुलाच्या मुलीची झाली आई

व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय तत्त्वज्ञानात करावे तसे भरावे, हे तत्व सांगितले जाते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून सर्वांना याच तत्त्वाची आठवण होत आहे. दुसऱ्या तरुणीला नाहक त्रास देऊ पाहणारी ही तरुणी स्वतःच खाली कोसळल्यामुळे तिला तिच्या कर्माची शिक्षा ताबडतोब मिळाल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून त्यावर लाईक आणि कमेंट्स चा पाऊस पडत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी