OMG: तिसऱ्या मुलाला जन्म द्या आणि १ वर्षाच्या सुट्टीसोबत मिळवा ११ लाख रूपये; या कंपनीची जबरदस्त ऑफर 

व्हायरल झालं जी
Updated May 05, 2022 | 15:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral News In Marathi | प्रामुख्याने कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी नवनवीन योजना आखत असतात. पण एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशी ऑफर आणली आहे, जी ऐकून लोक थक्क झाले आहेत.

Give birth to third child and get Rs 11 lakh with 1 year leave
तिसऱ्या मुलाला जन्म द्या अन् मिळवा ११ लाख रूपये  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तिसऱ्या मुलाला जन्म द्या अन् मिळवा ११ लाख रूपये.
  • चीनमधील कंपनीची भन्नाट ऑफर चर्चेत.
  • मे २०२१ मध्ये चीनने तीन अपत्य धोरण आणले आहे.

Viral News In Marathi | नवी दिल्ली : प्रामुख्याने कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी नवनवीन योजना आखत असतात. पण एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशी ऑफर आणली आहे, जी ऐकून लोक थक्क झाले आहेत. कारण त्या कंपनीचे म्हणणे आहे की, जो कर्मचारी तिसऱ्या मुलाला जन्म देईल त्याला १ वर्षाची सुट्टी आणि ११ लाख रूपये दिले जातील. खर तर कोणाचाच यावर विश्वास बसणार नाही. चला तर जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण. (Give birth to third child and get Rs 11 lakh with 1 year leave). 

अधिक वाचा : धन-संपत्तीच्या बाबतीत खूप लकी आहेत या ३ नावांचे लोक

चीनमधील कंपनीच्या ऑफरची सर्वत्र चर्चा 

हे विचित्र प्रकरण चीनमधील आहे. खर म्हणजे चीनने २०१६ मध्ये एक मूल घोरण रद्द केले. देशाच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे धोरण १९८० मध्ये सुरू करण्यात आले होते. तसेच मे २०२१ मध्ये चीनने तीन अपत्य धोरण आणले आहे. या अंतर्गत सरकार आपल्या नागरिकांना अधिकाधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर एका चिनी कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. माहितीनुसार बीजिंग डाबिनॉन्ग टेक्नॉलॉजी ग्रुपने सांगितले आहे की, तिसऱ्या मुलाला जन्म देण्यासाठी ९०,००० युआन म्हणजेच ११.५० लाख रुपये रोख दिले जातील. यासोबतच पुरुष कर्मचाऱ्यांना नऊ महिने तर महिला कर्मचाऱ्यांना एक वर्ष एवढी सुट्टी देण्यात येणार आहे.

कंपनीची जबरदस्त ऑफर 

याशिवाय कंपनीने असेही म्हटले आहे की, जो कर्मचारी दुसऱ्या मुलाला जन्म देईल त्याला ६० हजार युआन म्हणजेच सात लाख रुपये दिले जातील. जर एखाद्याने पहिल्या मुलाला जन्म दिला असेल तर त्याला तीस हजार युआन म्हणजेच साडेतीन लाख रुपये दिले जातील. कंपनीच्या या ऑफरची जगभरात चर्चा होत आहे. दरम्यान हिच कंपनी चीनची लोकसंख्या नियंत्रणात ठेवू शकते अशा हास्यास्पद प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी