म्हणून पोलिसांनी दोन बकऱ्यांना केली अटक, पाहा कुठं घडला हा प्रकार

व्हायरल झालं जी
Updated Sep 13, 2019 | 19:21 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Goat arrested by Police: चोरी केल्या प्रकरणी आरोपीला अटक केल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेलच मात्र आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. कारण, पोलिसांनी चक्क दोन बकऱ्यांनाच अटक केली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

Goat arrested for grazing saplings
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • पोलिसांनी दोन बकऱ्यांना केली अटक
  • तेलंगणा येथील विचित्र घटना आली समोर
  • तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्यातील हुजुराबाद शहरातील घटना

तेलंगणा: प्राणी किंवा जनावर कधी कुठला गुन्हा करु शकतात का? हा प्रश्न विचारण्या मागचं कारण म्हणजे तेलंगणा येथे एक वेगळीच आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. तेलंगणामध्ये पोलिसांनी दोन बकऱ्यांना अटक केली आहे. या दोन बकऱ्यांवर एनजीओने लावलेली झाडे चरल्याचा आरोप आहे. बकऱ्यांनी झाडे चरल्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. करीमनगर जिल्ह्यातील हुजुराबाद शहरात ही घटना घडली आहे.

जेव्हा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी या बकऱ्यांना चरताना पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या हवाले केलं. पोलिसांनी या दोन्ही बकऱ्यांना पोलीस ठाण्याच्या आवारात आणलं आणि बांधून ठेवलं. पोलीस निरीक्षक वसमशेट्टी मधावी यांनी सांगितले की, या बकऱ्यांची सुटका करण्यासाठी त्यांच्या मालकाने नगरपालिकेकडे १००० रुपयांचा दंड भरला आणि त्यानंतर या बकऱ्यांची सुटका केली.

पोलिसांनी 'सेव्ह द ट्री' या संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तक्रारी म्हटलं होतं की, सरकारी रुग्णालयाच्या परिसरात १५० झुडपे लावण्यात आली होती आणि याच झुडपांचा बकऱ्यांनी आपलं भोजन म्हणून चाऱ्यासारखा केला. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अटक करण्यात आलं नव्हतं. कारण, आयपीसीमध्ये बकऱ्यांना शिक्षा देण्या संदर्भात कुठलाही कायदा नाहीये.

पोलिसांनी पुढे म्हटलं की, आम्ही दोन्ही बकऱ्यांना त्यांच्या मालकाकडे सोपवल्या आहेत आणि त्याला सांगितले आहे की, पुन्हा बकऱ्यांकडून असं होणार नाही याची काळजी घ्या. गेल्या आठवड्यात याच शहरात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका बकरीला याच कारणामुळे पकडलं होतं. अशाच प्रकारची आणखीन एक घटना संगारेड्डी जिल्ह्यात घडली होती. येथील अधिकाऱ्यांनी बकरीला झुडपं चरल्यामुळे अटक केली होती आणि त्या बकरीच्या मालकाला ३,००० रुपयांचा दंड ठोठावला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी